Indian Citizenship Proof Documents : आता भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्र ग्राह्य?

2 Min Read
Indian Citizenship Proof Documents Passport Voter Id Rules 2025

Indian Citizenship Proof Documents Passport Voter Id Rules 2025 : तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड असल तरीही तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध होईलच अस नाही. नागरिकत्वाचा थेट पुरावा कोणता हे स्पष्ट करणारे नवे निकष दिल्ली पोलिसांकडून सध्या राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेमुळे समोर आले आहेत.

पार्श्वभूमी: वाढती सुरक्षा आणि अवैध रहिवाशांवर लक्ष

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अवैध मार्गाने भारतात राहणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेतली आहे. त्यातच दिल्ली पोलिसांनी नागरिकत्वाच्या आधारावर संशयितांची पडताळणी सुरू केली आहे.

आधार, पॅन, रेशन कार्ड नागरिकत्वाचे पुरावे नाहीत

बहुतेक भारतीयांकडे असणारी कागदपत्र — जस की आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स — हे सर्व ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र या कागदपत्रांना थेट ‘भारतीय नागरिकत्वाचा पुरावा’ म्हणून स्वीकारल जाणार नाही, अस पोलिसांनी स्पष्ट केल आहे.

कोणती कागदपत्र ग्राह्य धरली जातील?

१. भारतीय पासपोर्ट (Indian Passport):
भारतीय पासपोर्ट हा नागरिकत्वाचा सर्वात अधिकृत पुरावा मानला जातो. पासपोर्ट मिळवताना नागरिकत्वाची सखोल तपासणी होते.

२. मतदार ओळखपत्र (Voter ID):
भारताचे मतदार ओळखपत्र देखील नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी महत्त्वाच आहे, कारण फक्त भारतीय नागरिकांनाच मतदानाचा अधिकार असतो.

पोलिस तपासणी दरम्यान काय महत्त्वाच?

जर पोलिसांनी नागरिकत्वाचा पुरावा मागितला आणि तुमच्याकडे वरील दोन कागदपत्रांपैकी कोणतही नसेल, तर तपास, अटक किंवा कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद ठेवावी.

भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र हेच अधिकृत पुरावे मानले जातात. आधार किंवा पॅन कार्ड ही गरजेची ओळख कागदपत्र असली तरी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाहीत. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर ही माहिती प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची आहे.

हेही वाचा : PF काढण झाल खूपच सोप; १ लाखापर्यंतचा दावा फक्त ७२ तासांत खात्यात.

Share This Article