एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वेतनात होणार लक्षणीय वाढ; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा Maharashtra ST Workers Dearness Allowance June 2025 Update

2 Min Read
Maharashtra ST Workers Dearness Allowance June 2025 Update

Maharashtra ST Workers Dearness Allowance June 2025 Update : राज्य परिवहन महामंडळाच्या (ST Mahamandal) कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या जून २०२५ पासून एसटी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) दिला जाणार असल्याच त्यांनी स्पष्ट केल आहे. ही सवलत मूळ वेतनावर लागू करण्यात येणार असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरमहा सुमारे १९ कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल की, एसटी कर्मचाऱ्यांनाही आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) व वार्षिक वेतनवाढीचा दर (Annual Increment) लागू केला गेला आहे. या निर्णयामुळे ST कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे, जे त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी फायदेशीर ठरेल.

महागाई भत्त्याच्या २०१८ पासूनच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, त्याबाबत निधीच्या उपलब्धतेनुसार योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असही शिंदे यांनी स्पष्ट केल. न्यायालयाच्या आदेशानंतरही थकबाकी दिली गेलेली नव्हती, मात्र आता ५३ टक्के DA लागू करून या मागणीचा काही अंशी न्याय करण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एसटी महामंडळात कुशल मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितल की, विविध विभागांमध्ये आवश्यक अभियंते व अधिकाऱ्यांची भरती करार पद्धतीने किंवा सरळसेवेने करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन भरतीसाठी एकत्रित प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळे ST महामंडळातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार असून, परिवहन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा.

Share This Article