नवी दिल्ली | ७ जून २०२५: Qualcomm Security Alert Certin Warning For Android Users — देशातील कोट्यवधी Android मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Qualcomm चिपसेटवर चालणाऱ्या स्मार्टफोनसाठी भारत सरकारने सुरक्षा इशारा (Security Alert) जारी केला आहे. CERT-In अर्थात भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाकडून हा अलर्ट देण्यात आला असून, काही चिपसेट्समध्ये गंभीर सुरक्षात्मक त्रुटी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा फोन हॅक करू शकतात.
काय आहे प्रकरण?
Google च्या Threat Analysis Group ने सर्वप्रथम Qualcomm चिपसेट्समध्ये असलेल्या सुरक्षेच्या त्रुटींचा शोध लावला. यावर CERT-In ने प्रतिक्रिया देत एक अधिकृत चेतावणी जारी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या त्रुटीमुळे सायबर गुन्हेगार फोनमधील संवेदनशील माहिती चोरणे, फोनवर अनधिकृत कोड चालवणे, किंवा डिव्हाइसवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे अशा गंभीर प्रकारचे हल्ले करू शकतात.
कोणते चिपसेट आहेत धोक्याच्या रडारवर?
CERT-In च्या अहवालानुसार खालील Qualcomm चिपसेट्सवर ही धोकादायक त्रुटी आहे:
Snapdragon 480+ 5G
Snapdragon 662
Snapdragon 8 Gen 2
Snapdragon 8 Gen 3 (2024 फ्लॅगशिप मॉडेल)
याशिवाय काही GPU (Graphics Processing Units) आणि Wi-Fi मॉडेम्स मध्ये देखील सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत.
Qualcomm आणि CERT-In ची भूमिका
Qualcomm कंपनीने या त्रुटींची माहिती आधीच ओळखली असून आपल्या पार्टनर्सना, वापरकर्त्यांना आणि बिजनेस क्लायंट्सना खबरदारीचा इशारा दिला आहे. तथापि, CERT-In ने इशारा दिला आहे की काही सायबर गुन्हेगारांनी या त्रुटींचा आधीच गैरवापर केला असण्याची शक्यता आहे.
Android वापरकर्त्यांनी काय कराव?
जर तुमचा स्मार्टफोन Qualcomm चिपसेटवर चालत असेल, तर तुम्ही मे २०२५ चा Android सिक्योरिटी अपडेट तातडीने इन्स्टॉल करावा. हा अपडेट तुमच्या डिव्हाइसला संभाव्य सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवेल.
अपडेट कस करायच?
- फोनच्या Settings मध्ये जा
- खाली स्क्रोल करून System Updates वर टॅप करा
- Check for updates निवडा
- अपडेट उपलब्ध असल्यास, तो डाउनलोड करून इन्स्टॉल करा
- फोन रिबूट (Reboot) करा
यामुळे तुमचा मोबाईल डिव्हाइस लेटेस्ट सिक्योरिटी पॅचने सुरक्षित होईल.
जगभरात Android स्मार्टफोन्सचा वापर झपाट्याने वाढत असताना, सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे Qualcomm चिपसेट वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांनी सतर्क राहून तातडीने आपला फोन अपडेट करावा.
हेही वाचा : या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप? जाणून घ्या संपूर्ण माहिती.