Ayushman Card Eligibility Application Process Benefits 2025 : भारत सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेद्वारे (Ayushman Bharat Yojana) गरीब आणि गरजू नागरिकांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आयुष्मान कार्ड’ असणे आवश्यक आहे. तुम्हीही हे कार्ड मिळवू इच्छित असाल, तर आधी तुमची पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.
कोण बनवू शकतात आयुष्मान कार्ड?
आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवले आहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, BPL कुटुंबे, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर पात्र वर्गांचा समावेश आहे. SECC डेटा 2011 नुसार लाभार्थी ठरवले जातात.
पात्रता कशी तपासावी?
तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी https://pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइट उघडल्यानंतर ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा
तुमचा मोबाइल नंबर आणि राज्य निवडून OTP टाका
नंतर तुमचे नाव आणि तपशील भरून तुम्ही पात्र आहात का, हे तपासा
आयुष्मान कार्ड कसे बनवावे?
स्टेप 1:
तुमच्या जवळच्या CSC सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर) ला भेट द्या
स्टेप 2:
तेथे तुमची पात्रता तपासली जाईल. जर तुम्ही पात्र असाल, तर आवश्यक कागदपत्रे मागवली जातील
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अर्ज सादर केला जाईल
आणि थोड्याच दिवसात तुमचे आयुष्मान कार्ड तयार होईल
त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता
काय लाभ मिळतो?
कार्डधारकास सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळतो
वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा कवच
विविध गंभीर आजारांवरील उपचार मोफत
संपूर्ण देशभरात पात्र रुग्णालयात सुविधा उपलब्ध
कोणकोणते कागदपत्र लागतात?
आधार कार्ड
रेशन कार्ड किंवा BPL कार्ड
रहिवासी दाखला
पासपोर्ट साईझ फोटो
हेही वाचा : या योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा महिन्याला ₹9,250 व्याज.