लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट! कुणाला ₹५०० कुणाला ₹१५०० तर कुणाला ₹40,000? Ladki Bahin Yojana Latest Update

2 Min Read
Ladki Bahin Yojana Latest Update 8 June 2025

मुंबई | ८ जून २०२५: Ladki Bahin Yojana Latest Update 2025 — महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹१५०० रुपये मिळतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र या योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाभार्थी महिलांना दरमहा केवळ ५०० रुपयेच मिळत आहेत. त्यामागचे कारण काय आहे? आणि कोणत्या महिलांना हे कमी अनुदान दिल जात? याचे तपशील शासनाच्या अधिकृत निकषांमध्ये स्पषपने नमूद आहेत.

कोणत्या महिलांना मिळतो केवळ ₹५०० हप्ता?

राज्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ ₹५०० रुपये दिले जातात. कारण, या दोन्ही योजनांतून त्या महिलांना दरवर्षी ₹१२,००० इतका निधी आधीच मिळतो.

DBT मर्यादेमुळे ठरतो हप्ता

महाराष्ट्र सरकारच्या DBT (Direct Benefit Transfer) धोरणानुसार, एका लाभार्थ्याच्या खात्यावर वर्षभरात जास्तीत जास्त ₹१८,००० निधी थेट वर्ग करता येतो.
जर एखाद्या महिलेला PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेमधून एकत्रित ₹१२,००० मिळत असतील, तर उर्वरित ₹६,००० चा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ₹५०० या प्रमाणात दिला जातो.

राज्यातील एकूण किती महिलांना मिळतो ₹५०० चा हप्ता?

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास ७.७४ लाख महिला या दोन शेतकरी योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹५०० दिले जातात.

लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली आणि पात्र महिलांना एकूण किती रक्कम मिळाली?

महाराष्ट्रात जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेतून आजपर्यंत महिलांना एकूण ११ हप्त्यांमध्ये ₹१६,५०० इतकी रक्कम देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार ₹40,000 कर्ज

‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹40,000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, आणि विशेष बाब म्हणजे लाडक्या बहिणींना त्या कर्जाचा हफ्ताही फेडावा लागणार नाही कारण सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा हफ्ता महिलांना सध्या मिळत असणाऱ्या दरमहा ₹1500 च्या हफ्त्यातूनच फेडून घेतला जाणार आहे. अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

हेही वाचा : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ८ जूनला काही काळासाठी या सेवा बंद राहणार

Share This Article