Gharkul Yojana 2025 Apply Online: घरबसल्या असा करा घरकुल योजनेसाठी अर्ज

2 Min Read
Gharkul Yojana 2025 Apply Online

Gharkul Yojana 2025 Apply Online : ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना स्वतःच घर मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना 2025 राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत आता पात्र नागरिकांना ‘आवास प्लस’ अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया मोबाईलद्वारे करता येणार असून ती अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे.

Gharkul Yojana 2025 अर्ज करण्यासाठी अ‍ॅप्स

  1. प्ले स्टोअरवरून ‘आवास प्लस’ आणि ‘RD FACE’ हे दोन अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. ‘आवास प्लस’ अ‍ॅप उघडा आणि Citizen Beneficiary User पर्याय निवडा.
  3. आधार क्रमांक आणि सेल्फीद्वारे व्हेरिफिकेशन करा.
  4. यशस्वी व्हेरिफिकेशननंतर पिन तयार करा आणि लॉगिन करा.

अर्ज प्रक्रियेच्या स्टेप्स

  1. पत्ता माहिती: राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडून सेव्ह करा.
  2. कुटुंब प्रमुखाची माहिती: नाव, आधार क्रमांक, जॉब कार्ड क्रमांक, उत्पन्न इ.
  3. कुटुंबातील सदस्यांची संख्या: सर्व सदस्यांची माहिती भरा.
  4. बँक तपशील: बँकेचे नाव, IFSC कोड, ब्रँच कोड इ.
  5. घराची स्थिती: घर भाड्याच आहे की मालकीच, खोल्या, वाहन आहे का इ.
  6. फोटो अपलोड: घराचे काही फोटो अपलोड करा.
  7. घर नमुना निवड: सरकारकडून दिलेले घराचे नमुने पाहून एक निवडा.
  8. रिव्ह्यू व सबमिशन: माहिती तपासा, डिक्लेरेशन करा आणि फॉर्म सेव्ह करा.

आधार व जॉब कार्ड व्हेरिफिकेशन

अर्ज पूर्ण केल्यानंतर शेवटी आधार कार्ड आणि जॉब कार्ड व्हेरिफाय कराव लागेल.
दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर “Survey Saved Successfully” असा मेसेज दिसेल.

पुढील प्रक्रिया

एकदा अर्ज सेव्ह झाला की, तो ग्रामपंचायत स्तरावर पडताळणीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर पात्र अर्जदारांची नाव घरकुल योजनेच्या यादीत (Gharkul Yojana List 2025) समाविष्ट केली जातील.

हेही वाचा : मोबाईल सिमसाठी नवीन नियम.

Share This Article