Girl Child Saving Plan 2025: मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी ‘या’ शासकीय योजनेत गुंतवणूक करा, मिळतोय उत्तम परतावा

2 Min Read
Girl Child Saving Scheme 2025 Investment

Girl Child Saving Scheme 2025 Investment : मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची चिंता भेडसावत असते. मात्र योग्य नियोजन आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून भविष्यात मोठा निधी साठवता येतो. सरकारने मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही अत्यंत फायदेशीर गुंतवणूक योजना सुरू केल्या आहेत, ज्या फक्त सुरक्षित नाहीत तर आकर्षक परतावा देखील देतात.

सुकन्या समृद्धी योजना – ८.२% व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूक

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक विशिष्ट योजना आहे, जी मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी आर्थिक पाठबळ पुरवते. या योजनेत सध्या ८.२ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. मुलीच्या वयाच्या १० वर्षांपूर्वीच खाते उघडून या योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते, मात्र खात २१ वर्षांनी पूर्णपणे परिपक्व होत.

सुकन्या समृद्धी योजना करसवलत, सुरक्षितता आणि निश्चित परतावा यासाठी ओळखली जाते. त्यामुळे आज लाखो पालक आपल्या मुलीच्या नावावर सुकन्या योजना सुरू करत आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) – दीर्घकालीन आणि करमुक्त बचत पर्याय

पीपीएफ योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. सध्या या योजनेत ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडून दरवर्षी किमान ₹५०० पासून ₹१.५ लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.

उदाहरणार्थ, जर आपण दरमहा ₹१०,००० गुंतवणूक केली, म्हणजे वार्षिक ₹१,२०,०००, तर १५ वर्षांनंतर तुमचा अंदाजे ₹३२.५४ लाखांचा निधी तयार होतो. शिवाय या योजनेवरील व्याज व परतावा पूर्णपणे करमुक्त आहे.

हेही वाचा : PM Mudra Yojana: या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कोणाला मिळत नाही? येथे जाणून घ्या.

Share This Article