UPI फ्रॉडपासून सावध! मोबाईलवरून पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा UPI Payment Safety Tips

2 Min Read
UPI Payment Safety Tips Avoid Fraud Screen Share Pay Request OTP Warning

UPI Payment Safety Tips Avoid Fraud Screen Share Pay Request OTP Warning : यूपीआयच्या (UPI) वापरामुळे डिजिटल पेमेंट जरी सोप झाल असल, तरी सायबर गुन्हेगारांनी याचा गैरवापर करून लोकांचे पैसे लुबाडण्यास सुरुवात केली आहे. आज छोट्या व्यवहारांपासून ऑनलाइन खरेदीपर्यंत यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असताना, प्रत्येकाने सावध असण आणि योग्य माहिती असण अत्यावश्यक आहे. अन्यथा आर्थिक फसवणुकीचा फटका बसू शकतो.

सायबर फ्रॉडचा नवा ट्रेंड: अनोळखी लिंक्स आणि Pay Request

UPI वापरताना सध्या मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार स्क्रीन शेअरिंग, Pay Request आणि फसव्या कॉलच्या माध्यमातून होत आहेत. मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करण किंवा अज्ञात व्यक्तीने पाठवलेली Pay Request स्वीकारण आर्थिक संकट निर्माण करू शकत.

स्क्रीन शेअरिंग अॅप्सपासून दूर रहा

फसवणूक करणारे अनेकदा स्क्रीन शेअरिंग अॅप्स वापरून तुमच्या मोबाईलवर ताबा मिळवतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून असे अॅप्स डाउनलोड करू नका. एकदा मोबाईलचा ताबा मिळाल्यास ते तुमचे UPI, बँक अ‍ॅप्स, पासवर्ड व OTP सहज मिळवू शकतात.

Pay Request म्हणजे फसवणुकीचा फंदा

अनेक वेळा तुम्हाला एखाद्याकडून Pay Request येते आणि सांगितलं जात की पिन टाकताच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ही माहिती चुकीची असून, UPI PIN हा नेहमी पैसे “पाठवण्यासाठी” वापरला जातो, मिळवण्यासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला जर Pay Request आली तर ती नाकारा.

UPI PIN, OTP कुणालाही सांगू नका

कोणतीही बँक किंवा अधिकृत UPI अ‍ॅपचे कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह फोनवरून PIN, OTP किंवा पासवर्ड विचारत नाहीत. जर तुम्हाला कोणी बँकेच्या नावाने असे विचारत असेल, तर ती फसवणूक असल्याची स्पष्ट खूण आहे. कोणासोबतही फोन कॉलवर आपली खासगी माहिती शेअर करू नये.

UPI चा वापर करताना सावधगिरी बाळगण ही काळाची गरज आहे. अनोळखी अॅप्सपासून दूर राहा, Pay Request स्वीकारू नका, आणि कोणालाही PIN किंवा OTP सांगू नका. थोडीशी काळजी हजारो रुपयांचे नुकसान टाळू शकते.

हेही वाचा : आता भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्र ग्राह्य?.

Share This Article