मुंबई | Maharashtra Weather Alert Rain Thunderstorm 5 June 2025 – महाराष्ट्रात सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरु असताना, राज्यात पुन्हा एकदा हवामान बदलाची चिन्ह दिसून येत आहेत. हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या भागात पाऊस?
राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग
गुरुवारीपासून राज्यात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज असून, त्याचबरोबर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
मान्सूनचा प्रवास थांबलेला
मोसमी वाऱ्यांची पुढची वाटचाल अद्यापही रेंगाळलेली आहे. मुंबई, आदिलाबाद, पुरीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून थांबलेला असून, पुढील टप्प्यातील सरकण सुरू व्हायला थोडा अवधी लागू शकतो, अस हवामान विभागाने स्पष्ट केल आहे.
राज्यात अजूनही ऊन-पावसाचा खेळ सुरू
तापमानातील चढ-उतार कायम असून, ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट आणि अल्प पावसाने वातावरणात गारवा जाणवतोय. येत्या काही दिवसात तापमान आणि पावसात बदल होत राहणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत अपडेट्सकडे लक्ष द्याव.
हेही वाचा : यांना आता बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची गरज नाही, नवीन नियम लागू.