Cash At Home India Law Marathi – अनेकदा आपण ऐकतो की आयकर विभागाने एखाद्याच्या घरावर छापा टाकून लाखोंची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या. अशा बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न हमखास निर्माण होतो – भारतात घरात किती रोख रक्कम ठेवणे कायदेशीर आहे? आणि यावर कोणता कायदा लागू होतो? अनेकदा चुकीच्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात, पण वास्तविक नियम काय सांगतो हे जाणून घेण महत्त्वाच आहे.
भारतात सध्या घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही. म्हणजेच, कितीही रक्कम घरात ठेवता येऊ शकते, परंतु ती रक्कम प्रामाणिकपणे मिळवलेली, अधिकृत उत्पन्नातून आलेली असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे, तुम्ही ती रक्कम तुमच्या इनकम टॅक्स रिटर्न (ITR) मध्ये दाखवली आहे का आणि तिचा योग्य स्त्रोत (Source of Income) स्पष्ट करता येतो का, हे तपासले जाते.
आयकर कायद्यातील कलम 68 ते 69B असे नमूद करतात की जर तुमच्याकडे असलेली रक्कम, मालमत्ता किंवा संपत्ती ही “असमर्थनीय” म्हणजेच ज्याचा स्त्रोत स्पष्ट करता येत नाही, अशी आढळली, तर ती अघोषित उत्पन्न (Undisclosed Income) म्हणून धरली जाऊ शकते. अशा वेळी सरकारकडून 78% पर्यंत दंड आणि कर लावले जाऊ शकतात.
म्हणूनच, रक्कम किती ठेवली आहे यापेक्षा ती कशी मिळवली आहे, कुठून आली आहे हे दाखवण महत्त्वाच आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुमच्या व्यवहारांची नोंद तुमच्या बिझनेस अकाउंटबुकमध्ये आणि रोखपुस्तिकेत योग्य रीतीने दाखवली गेली पाहिजे. उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची कागदपत्रे तयार असावीत आणि आयटीआरमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा.
थोडक्यात सांगायच झाल, तर घरात कितीही रोख रक्कम ठेवण बेकायदेशीर नाही, परंतु तिच्या उत्पत्तीबाबत पारदर्शकता असली पाहिजे. जर तुम्ही प्रामाणिक कमाई केली असेल, तुम्हाला ती योग्यप्रकारे दाखवता आली, आणि तिच पुराव्यांसह दस्तऐवजीकरण करता आल तर तुम्हाला घाबरण्याच काहीच कारण नाही.
हेही वाचा : PF चे पैसे कधीपासून ATM व UPI द्वारे काढता येणार? EPFO चा मोठा निर्णय.