Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन? कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?

2 Min Read
Maharashtra Weather Update Rain Return Temperature Heatwave 7 June 2025

Maharashtra Weather Update Rain Return Temperature Heatwave 7 June 2025 : राज्यात काही भागांमध्ये पावसाचे ढग पुन्हा एकदा जमू लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भात उकाडा प्रचंड वाढला असून नागपूर व ब्रम्हपुरी येथे तापमान चाळीशीच्या वर पोहोचले आहे.

पाऊस पुन्हा सक्रिय होतोय

राज्यात काही काळ विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीपासून घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात शनिवारी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही हलक्याशा सरींचा अंदाज आहे.

कोणत्या भागांमध्ये पडणार पाऊस?

पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली – वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
विदर्भ : अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा – विजांच्या कडकडाटासह पाऊस
मराठवाडा : धाराशिव, सोलापूर भागात पावसाचा अंदाज
घाटमाथा : मेघगर्जनेसह पावसाचे संकेत

तापमान वाढतंय…

पावसाची चिन्ह असतानाही राज्यातील काही भागात उकाड्याचा जोर कायम राहणार आहे. ब्रम्हपुरी येथे काल ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नागपूरमध्ये तापमान ४१.८ अंशांवर होते. मुंबईतही आर्द्रतेमुळे उष्णता अधिक जाणवत आहे.

पुढचे काही दिवस तापमान?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. राज्याच्या दक्षिण भागात सरासरीहून जास्त पावसाची शक्यता असून, जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे.

हेही वाचा : ६० वर्षांनंतर दर महिन्याला ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्याची सुवर्णसंधी.

Share This Article