Aadhaar कार्ड हरवले? आधार मिळवण्यासाठी सरकारने दिला सोपा पर्याय – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2 Min Read
Aadhaar Card Duplicate Online Process Marathi UIDAI 2025

Aadhaar Card Duplicate Online Process Marathi UIDAI 2025 : जर तुमचे Aadhaar कार्ड हरवले असेल, खराब झाले असेल किंवा वापरण्यास अयोग्य स्थितीत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्ड मिळवण्यासाठी एक अतिशय सोपी व विनामूल्य प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

UIDAI द्वारे आधार कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन, हेल्पलाइन कॉल, अथवा नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो. चला तर मग जाणून घेऊया हे सर्व पर्याय कसे कार्य करतात:

ऑनलाइन पद्धत:

  1. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (uidai.gov.in) जा
  2. ‘Aadhaar Services’ विभागात ‘Retrieve Lost UID/EID’ पर्याय निवडा
  3. तुमचे नाव, नोंदणीकृत मोबाइल नंबर/ईमेल व कॅप्चा कोड भरा
  4. OTP पाठवा आणि आलेला OTP टाका
  5. UID (आधार क्रमांक) किंवा EID तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल/ईमेलवर मिळेल
  6. UIDAI पोर्टलवर जाऊन डुप्लिकेट Aadhaar कार्ड डाउनलोड व प्रिंट करू शकता

हेल्पलाइन कॉलद्वारे (1947):

UIDAI च्या टोल फ्री क्रमांकावर (1947) कॉल करा
तुमचे डेमोग्राफिक डिटेल्स (नाव, DOB, PIN कोड) सांगा
माहिती जुळल्यास, कार्यकारी अधिकारी तुम्हाला EID आणि UID सांगतील
ही सेवा पूर्णपणे मोफत आहे

आधार सेवा केंद्रावर जाऊन:

जवळच्या आधार नामांकन/अपडेट केंद्रावर जा
तुमची माहिती द्या (नाव, लिंग, पत्ता इ.)
बायोमेट्रिक पडताळणी (फिंगरप्रिंट/आयरीस) होईल
जुळल्यास, 30 रुपयांमध्ये डुप्लिकेट Aadhaar प्रिंट करून दिले जाईल

महत्त्वाची माहिती:

या प्रक्रियेत तुम्हाला नवीन Aadhaar नंबर मिळणार नाही, तर तुमच्या मूळ Aadhaar नंबरची डुप्लिकेट प्रत मिळेल
आधार UID किंवा EID हरवल्यास, ते पुन्हा मिळवणे अगदी सोपे आहे.

🔴 हेही वाचा 👉 गोठा बांधण्यासाठी सरकारकडून ७७,१८८ रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन.

Share This Article