Digipin India Gps Based Digital Address Launch : जस प्रत्येक भारतीयाला आधार कार्डद्वारे युनिक ओळख मिळते, तसच आता तुमच्या घरालाही मिळणार आहे युनिक Digital Address Code. पोस्ट खात्याने अलीकडेच एक अभिनव उपक्रम म्हणून DigiPin सुरू केला आहे, जो पारंपरिक पिनकोडच्या मर्यादांना पार करतो आणि कोणत्याही ठिकाणाची अचूक GPS-आधारित लोकेशन ओळख पुरवतो. हे विशेषतः ग्रामीण भागांमध्ये आणि टीयर-3 शहरांमध्ये पार्सल डिलिव्हरीचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
DigiPin म्हणजे Digital Pin, जो 10 अंकी अल्फा-न्यूमेरिक कोड असतो आणि प्रत्येक घर, दुकान, इमारत किंवा स्थानाला युनिक डिजिटल ओळख देतो. पारंपरिक पिनकोड जिथे संपूर्ण क्षेत्राला एकसमान कोड देतो, तिथे DigiPin एका 4×4 मीटरच्या अचूक क्षेत्रासाठी खास लोकेशन आयडेंटिफिकेशन प्रदान करतो. हे पूर्णपणे GPS तंत्रज्ञानावर आधारित असून, ऑफलाइनही वापरता येऊ शकते.
उदाहरणार्थ, ग्रामीण भागात किंवा अशा परिसरात जिथे रस्त्यांची नावे, घर क्रमांक, गल्ल्या स्पष्ट नाहीत, तिथे पार्सल पोहोचवताना डिलिव्हरी एजंटना अडचणी येतात. DigiPin मुळे आता त्या अडचणी दूर होणार आहेत. तुम्ही DigiPin तयार करून तो कोड डिलिव्हरीसाठी शेअर करू शकता, जेणेकरून एजंट थेट तुमच्या अचूक लोकेशनवर पोहोचेल – ना फोन करावा लागेल, ना पत्ता शोधावा लागेल.
या नव्या प्रणालीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांसाठी देखील डिलिव्हरी सुलभ होणार आहे. अशा ठिकाणी जिथे आजवर पत्ते पूर्ण आणि स्पष्ट नव्हते, तिथे DigiPin मुळे AI आधारित प्रणाली अचूक डेटाचा अभ्यास करू शकतील, जसे की कोणत्या भागात डिलिव्हरी अयशस्वी होते, कोणत्या ठिकाणी वारंवार अडचणी येतात.
सध्या DigiPin काही भागांत पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला गेला आहे, मात्र भविष्यात या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स कंपन्या भविष्यात कदाचित ग्राहकांकडून चेकआउट दरम्यान DigiPin मागू शकतात, म्हणजे पूर्ण पत्ता टाकण्याची गरजच नाही – फक्त एक कोड आणि तुमच पार्सल योग्य वेळी, योग्य ठिकाणी!
DigiPin जनरेट करणे खूप सोप्प आहे. तुम्ही https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या लिंकवर जाऊन तुमच लोकेशन ऍक्सेस करून सहज 10 अंकी DigiPin तयार करू शकता. तो कोड तुम्ही कॉपी करून कुणालाही शेअर करू शकता.