Maharashtra Heavy Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून अपेक्षेपेक्षा 12 दिवस आधीच दाखल झाला असून हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्याना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसाठी हेवी रेन वॉर्निंग, पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्यानुसार पुढील २४ तासांत या भागांमध्ये अतिवृष्टीसह विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई-पुणे हवामानाचा अंदाज
मुंबई – ढगाळ वातावरण, २४°C ते ३१°C तापमान, ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
पुणे – ५ दिवस ढगाळ वातावरण कायम; २९ मे रोजी मध्यम पाऊस, नंतर हलक्या सरी, जून १-२ दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
यंदाचा मान्सून ‘साधारणपेक्षा जास्त’
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात यंदा मान्सून ‘साधारणपेक्षा जास्त’ राहण्याची शक्यता आहे. चार प्रमुख हवामान विभागांमध्ये खालील प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे:
मराठवाडा – 112%
मध्य महाराष्ट्र – 110%
विदर्भ – 109%
कोकण व गोवा – 107%
जून महिन्यातही अनेक भागांमध्ये हंगामी सरासरीइतका किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच आवाहन केल आहे
अधिकृत अपडेट्स पाहूनच निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
विशेषतः रेड अलर्ट जिल्ह्यांमध्ये सतर्क राहा, घराबाहेर जाण टाळा
नाले व पाण्याने भरलेल्या भागात जाऊ नका
🔴 हेही वाचा 👉 पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची वाट पाहताय? ‘हे’ काम करायला उशीर झाला तर २ हजार रुपये विसरा.