Marathi Language Compulsory: सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; मात्र हिंदीची सक्ती नाही

2 Min Read
Marathi Language Compulsory Maharashtra Hindi Not Mandatory 2025

मुंबई, १८ जून २०२५ : Marathi Language Compulsory Maharashtra Hindi Not Mandatory 2025 — राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकणे ऐच्छिक असेल, मात्र मराठी भाषा शिकणे सर्व माध्यमांसाठी अनिवार्य असेल, असा स्पष्ट निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केले.

हिंदी ऐच्छिक; मराठी बंधनकारक

पूर्वीच्या आदेशानुसार इयत्ता १ ली ते ५ वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीने शिकवावी लागणार होती, मात्र या निर्णयाला विविध संघटनांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी सरकारला इशारा दिला होता की, “हिंदीची सक्ती केल्यास शाळांमध्ये हिंदी पुस्तक पोहोचू दिली जाणार नाहीत.”

राज्य सरकारने मागचा निर्णय मागे घेत नव्याने स्पष्ट केले आहे की, हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सर्वसाधारणपणे शिकवली जाईल, मात्र विद्यार्थी इच्छेनुसार इतर भारतीय भाषा देखील निवडू शकतील.

इतर भाषांनाही संधी

विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा (उदाहरणार्थ – संस्कृत, गुजराती, उर्दू, कन्नड) तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, किमान २० विद्यार्थ्यांची संख्या असल्यास त्या भाषेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, अन्यथा ती भाषा ऑनलाइन माध्यमातून शिकवली जाईल.

सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची

नवीन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही अनिवार्य भाषा असणार आहे.

इयत्ता १ ली ते ५ वी:

मराठी माध्यम – मराठी, इंग्रजी आणि तृतीय भाषा (हिंदी किंवा अन्य)
इंग्रजी माध्यम – इंग्रजी, मराठी आणि तृतीय भाषा (हिंदी किंवा अन्य)
इतर माध्यम – माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी

इयत्ता ६ वी ते १० वी: भाषांचा अभ्यासक्रम राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसारच असेल.

हेही वाचा : SBI चा खातेदारांना झटका; बचत व एफडीवरील व्याजदरात कपात.

Share This Article