Petrol Diesel Price Cut Update India 2025 : देशातील नागरिकांना सतत त्रस्त करणाऱ्या इंधन दरांमध्ये कपात होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महागाईच्या काळात नागरिकांच्या खिशावर प्रचंड ताण आणत असताना, या दरांमध्ये काहीसा दिलासा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारच सावध धोरण, जागतिक घडामोडींवर बारीक लक्ष
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने सध्या पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत तत्काळ निर्णय घेण्याऐवजी ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारल आहे. सरकार जागतिक तेल बाजारातील घडामोडी — विशेषतः रशियन तेल आयातीवरील संभाव्य अमेरिकी शुल्क — यावर बारकाईन नजर ठेवून आहे.
भारतात सध्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ३५ टक्के तेलाची आयात रशियातून केली जाते. रशियन तेल भारताला तुलनेत स्वस्त दरात मिळत असल्यामुळे, पाश्चात्य निर्बंध किंवा अमेरिकी धोरणात्मक बदलांचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
सदर निर्णयाआधी स्पष्टता आवश्यक – सरकारी सूत्रांची माहिती
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेल दर कपातीचा निर्णय घेण्याआधी अनेक बाबी स्पष्ट होण गरजेच आहे. त्यामुळे सरकार अद्याप कोणताही निर्णय घेण टाळत आहे.
त्याचबरोबर, ओपेक देशांनी उत्पादनात वाढ करत कच्च्या तेलाच्या उपलब्धतेची चिंता कमी केली आहे. दररोज १२ लाख बॅरलची वाढ करण्यात आली असून, कच्च्या तेलाचा जागतिक तुटवडा नसल्याच देखील सांगण्यात येत आहे.
भारतीय तेल कंपन्यांच धोरण
भारतीय तेल कंपन्या सोर्सिंगमध्ये वैविध्य आणण्यास तयार आहेत, मात्र सवलतीच्या दरात तेल मिळवण भविष्यात अधिक कठीण होऊ शकत, अस सांगण्यात येत आहे. जागतिक निर्बंध लादल्यास त्याचा परिणाम भारताच्या खरेदी क्षमतेवर होऊ शकतो.
सरकारची सध्याची भूमिका सावध आणि जागरूक असून, जागतिक धोरणात्मक स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच पेट्रोल आणि डिझेल दरांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी अद्याप थेट दर कपातीची अपेक्षा ठेवण्याऐवजी, सरकारी धोरणातील स्पष्टतेची वाट पाहणेच योग्य ठरेल.
हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! 8वा वेतन आयोग लागू होण्यास विलंब.