RBI Guidelines On 10 Rupee Coins Legal Currency Warning : सध्या सोशल मिडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यात दावा असा आहे की 1 जूनपासून 10 रुपयांची नाणी चलनातून बाद होणार आहेत. अनेक लोक संभ्रमात आहेत, तर काही दुकानदारांनी ही नाणी घेण्यास नकार देण्यास सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर RBI ने अचानक नवी मार्गदर्शक सूचना जाहीर करत स्पष्टवक्तेपणा दाखवला आहे. पण या सूचनेचा अर्थ नेमका काय? आणि खरंच 10 रुपयांची नाणी बंद होणार आहेत का?
या नव्या सूचनेमध्ये RBI ने काय म्हटल आहे, नाण्यांचे कोणते डिझाइन्स वैध आहेत, आणि जर कोणी नाणी स्वीकारायला नकार दिला तर कायद्यान त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते – हे सर्व जाणून घ्या या रिपोर्टमध्ये…
10 रुपयांच्या नाण्यांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये संभ्रमाची आणि अफवांची लाट पसरली आहे. काही व्यापारी आणि दुकानदार ही नाणी स्वीकारण्यास नकार देतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने स्पष्ट भूमिका घेत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
आरबीआयने स्पष्ट केल आहे की, 10 रुपयांची सर्व नाणी वैध चलन आहेत आणि देशभरात कायदेशीर मान्यता प्राप्त आहेत. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 14 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये 10 रुपयांची नाणी जारी करण्यात आली आहेत. या सर्व नाण्यांना कायदेशीर वैधता आहे आणि कोणीही ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. अशा प्रकारे नाणी न स्वीकारणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
कशी ओळखाल खरी आणि बनावट 10 रुपयांची नाणी?
🔸 डिझाईन आणि नक्षीकाम: नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि खाली “भारत” आणि “India” लिहिलेल असत. दुसऱ्या बाजूला “₹10” आणि त्याभोवती कमळ, रेषा किंवा इतर चिन्ह असू शकतात.
🔸 धातू आणि रंग: 10 रुपयांच नाण बाय-मेटॅलिक असत – बाहेरचा भाग अॅल्युमिनियम-ब्रॉन्झ आणि आतला भाग निकेल-ब्रॉन्झ पासून बनलेला असतो. बनावट नाण्यांमध्ये रंगात फिकटपणा जाणवतो.
🔸 वजन आणि आकार: खऱ्या नाण्यांच वजन संतुलित असत; बनावट नाण हलक किंवा जास्त जड वाटू शकत.
🔸 आवाज: खऱ नाण जमिनीवर टाकल्यावर मेटलचा स्पष्ट आवाज येतो, तर बनावट नाण्यांमधून बोथट किंवा खोखळ आवाज येतो.
🔸 चुंबकीय प्रभाव: खऱ्या नाण्यांमध्ये सौम्य चुंबकीय गुणधर्म असतो. बनावट नाण्यांमध्ये हा प्रभाव अति असतो.
शंका असल्यास काय करावे?
जर कोणालाही 10 रुपयांच्या नाण्याबाबत शंका असेल, तर RBI ने यासाठी टोल-फ्री क्रमांक 14440 उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फोन केल्यानंतर काही सेकंदांत आपोआप कॉल येतो आणि IVR प्रणालीद्वारे नाण्यांची संपूर्ण माहिती दिली जाते.
ही सूचना जनतेमध्ये 10 रुपयांच्या नाण्यांबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी महत्त्वाची आहे.
🔴 हेही वाचा 👉 117 वर्षांपूर्वीच्या जुन्या कायद्यात मोठा बदल; आता घरबसल्या करा प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन.