₹५०० च्या नोटा बंद होणार? सरकारचा मोठा खुलासा; RS 500 Note News

2 Min Read
RS 500 Note Not Discontinued PIB Fact Check June 2025

नवी दिल्ली | ७ जून २०२५: RS 500 Note Not Discontinued PIB Fact Check June 2025 — सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये ₹५०० ची नोट मार्च २०२६ पासून बंद होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्याला भारत सरकारने फेटाळल आहे. आणि स्पष्ट केल आहे की ₹५०० च्या नोटा पूर्णपणे वैध असून त्या बंद होणार नाहीत.

यूट्यूबवरील अफवेमुळे फटका

RS 500 Note News : Capital TV नावाच्या यूट्यूब चॅनेलने २ जून २०२५ रोजी एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यात असा दावा करण्यात आला की ₹५०० च्या नोटा हळूहळू बंद केल्या जातील आणि २०२६ पासून त्या चलनातून पूर्णपणे काढून टाकल्या जातील. या १२ मिनिटांच्या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये मोठा संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती.

PIB ने केला अधिकृत खुलासा

या व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर PIB (Press Information Bureau) Fact Check विभागाने X (पूर्वीच Twitter) वर पोस्ट करत खुलासा केला आहे —

“₹५०० च्या नोटा बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्या अजूनही वैध चलन म्हणून वापरात आहेत.”

PIB ने नागरिकांना आवाहन केल आहे की,

“कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत स्रोतांवरूनच पडताळणी करा.”

मागील पार्श्वभूमी

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ₹५०० आणि ₹१००० च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नवीन ₹५०० रुपयांच्या नोटा आणि ₹२००० च्या नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र, मे २०२३ मध्ये ₹२००० च्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या, तरीही त्या कायदेशीर चलन म्हणून अजूनही वैध आहेत.

हेही वाचा : गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांना RBI चा मोठा दिलासा; एलटीव्ही लिमिटमध्ये वाढ.

Share This Article