नवी दिल्ली | ७ जून २०२५: SBI Online Banking UPI Yono Maintenance Alert June 2025 — देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ८ जून २०२५ रोजी काही तास बँकेच्या डिजिटल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नियोजित मेंटेनन्स (Maintenance Activity) मुळे UPI, YONO, IMPS, NEFT, RTGS आणि रिटेल इंटरनेट बँकिंग सेवा ८ जून रोजी पहाटे ३:४५ ते ४:३० या वेळेत थांबवण्यात येणार आहेत.
कोणत्या सेवांवर परिणाम होणार?
बंद राहणाऱ्या सेवा (८ जून २०२५, ३:४५ AM ते ४:३० AM):
UPI
IMPS
YONO
रिटेल इंटरनेट बँकिंग
NEFT
RTGS
कोणत्या पर्यायी सेवा वापरता येतील?
SBI ने ग्राहकांना सल्ला दिला आहे की या कालावधीत ग्राहकांनी UPI Lite आणि ATM सेवा वापराव्यात.
UPI Lite: छोट्या व्यवहारांसाठी, PIN शिवाय व्यवहार करता येतो.
ATM सेवा: रोख रक्कम काढण्यासाठी व अन्य बेसिक सेवा वापरण्यासाठी उपयुक्त.
ही प्रक्रिया का केली जाते?
SBI ने स्पष्ट केल आहे की ही एक नियमित देखभाल (Scheduled Maintenance) प्रक्रिया आहे आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी वेळोवेळी ती केली जाते.
हेही वाचा : ₹५०० च्या नोटा बंद होणार? सरकारचा मोठा खुलासा.