या कामगारांसाठी सरकारची नवीन योजना सुरू; मिळणार ओळखपत्र, ५ लाखांपर्यंत अनुदान आणि… Gopinath Munde Sugarcane Workers Scheme

2 Min Read
Gopinath Munde Sugarcane Workers Scheme Registration

Gopinath Munde Sugarcane Workers Scheme Registration : महाराष्ट्रातील सुमारे १२ लाख ऊसतोड कामगारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळा’च्या माध्यमातून विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ऊसतोड कामगाराची नोंदणी केली जाणार असून त्यांना अधिकृत ओळखपत्र वितरित केले जाईल. नोंदणी झालेल्या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये पाच लाखांपर्यंतचे अनुदानही समाविष्ट आहे.

कामगार कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

या योजनेअंतर्गत राज्यभरात ऊसतोड कामगार नोंदणी सुरू झाली असून, यासाठी खास एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक कामगारासाठी १७५ रुपयांचा खर्च शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर कामगारांना आरोग्य, अपघात व नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळेल.

कोणत्या लाभांची तरतूद?

अपघातात मृत्यू झाल्यास – ₹5,00,000
अपघातामुळे अपंगत्व – ₹2,50,000
वैद्यकीय खर्च – ₹50,000
झोपडी जळाल्यास – ₹10,000
बैलजोडी अपघात/अपंगत्व – ₹75,000 ते ₹1,00,000

अपघात व नुकसान यासाठी योजना लागू

ही योजना गाळप हंगामादरम्यान झालेल्या अपघातांना लागू राहणार असून रस्ता अपघात, विजेचा धक्का, जनावरांचा हल्ला, औषध विषबाधा, साप चावणे, बाळंतपणातील मृत्यू यासारख्या घटनांमध्ये लाभ दिला जाणार आहे. मात्र नैसर्गिक मृत्यू, जुने अपघात किंवा जाणूनबुजून केलेली हानी यास योजनेतून वगळण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ऊसतोड ओळखपत्र
मृत्यू प्रमाणपत्र (मृत्यू असल्यास)
वारसाचे प्रमाणपत्र
वयाचा दाखला
पंचनामा व नुकसान फोटो

प्रस्ताव ३० दिवसांच्या आत जिल्हा सहआयुक्त समाजकल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : फक्त 7 रुपये गुंतवून मिळवा 5,000 रुपये पेन्शन; 7.60 कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ.

Share This Article