PM Kisan Yojana 20th Installment: २०वा हप्ता कधी मिळणार?

2 Min Read
PM Kisan Yojana 20th Installment Eligibility 2025

PM Kisan Yojana 20th Installment Eligibility 2025 : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही देशभरातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्यात येतात, जे 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित होतात.

सध्या शेतकरी पिएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. मागील हप्त्यांचा विचार करता, हा हप्ता जून 2025 मध्येच जमा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हप्ता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत?

पात्र शेतकऱ्यांनी खालील तीन गोष्टी पूर्ण केलेल्या असाव्यात:

  1. भू-सत्यापन पूर्ण असणे (Land Verification):
    शेतकऱ्याची जमीन खरच त्याच्या नावावर आहे का याची पडताळणी शासन करते. जर हे सत्यापन झाले नसेल, तर हप्ता रोखला जाऊ शकतो.
  2. ई-केवायसी (e-KYC):
    प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. हे काम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर, मोबाईल अ‍ॅपवर किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन करता येते.
  3. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे:
    शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. हे काम संबंधित बँकेत जाऊन करावे लागते. लिंक नसल्यास हप्ता थांबू शकतो.

कोण वंचित राहतील?

ज्यांनी वरील तीन पैकी एखादी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही
ज्या शेतकऱ्यांनी खोटी माहिती देऊन अर्ज केला आहे
ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आलेले नाही

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: सौरचालित फवारणी पंप खरेदीवर सरकारकडून 70% ते 100% अनुदान.

Share This Article