SBI Har Ghar Lakhpati Yojana: दर महिन्याला फक्त ₹5,825 गुंतवून मिळवा १० लाख रुपये, SBI ने व्याजदरांमध्ये केले महत्त्वाचे बदल

2 Min Read
SBI Har Ghar Lakhpati Scheme RD Interest Update

SBI Har Ghar Lakhpati Scheme RD Interest Update : भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या लोकप्रिय ‘हर घर लखपती योजना’ (SBI Har Ghar Lakhpati Yojana) या योजनेअंतर्गत व्याजदरांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या नवीन व्याजदरांनुसार, आता सर्वसामान्य नागरिकांना ६.५५% आणि जेष्ठ नागरिकांना ७.०५% वार्षिक व्याज मिळणार आहे. ही योजना एक प्रकारची Recurring Deposit (RD) योजना असून, याद्वारे ग्राहक थोडी-थोडी रक्कम दर महिन्याला गुंतवून भविष्यासाठी मोठा निधी तयार करू शकतात.


एसबीआयची ‘हर घर लखपती योजना’ विशेषतः मध्यमवर्गीय आणि नियमित बचत करणाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. यात १० वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला ₹६,००० गुंतवल्यास सुमारे ₹१० लाखांचा फंड तयार होतो. जेष्ठ नागरिकांना या योजनेचा अधिक लाभ मिळतो, कारण त्यांना थोडी कमी रक्कम म्हणजेच ₹५,८२५ गुंतवूनही जवळपास ₹१० लाखांचा फंड मिळू शकतो.


SBI बँकेने नुकत्याच केलेल्या बदलांनुसार, विविध कालावधीसाठी व्याजदर खालील प्रमाणे आहेत:

३ ते ४ वर्षांची मॅच्युरिटी निवडणाऱ्या सामान्य नागरिकांना ६.५५% आणि जेष्ठ नागरिकांना ७.०५% इतका सर्वाधिक व्याज दर लागू होतो.


५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी व्याजदरात थोडी घट झाली असून, सामान्य नागरिकांना ६.३०% आणि जेष्ठ नागरिकांना ६.८०% व्याज मिळते.


उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाने १० वर्षांसाठी दर महिन्याला ₹६,००० गुंतवतो, तर त्याची एकूण गुंतवलेली रक्कम ₹७.२० लाख होते आणि मॅच्युरिटीला त्याला ₹१०,०२,८७८ मिळतात. याचप्रकारे, जेष्ठ नागरिकांसाठी हेच गणित थोड अधिक फायद्याच ठरत. त्यांना दर महिन्याला ₹५,८२५ गुंतवावे लागतात आणि मॅच्युरिटीला त्यांना ₹१०,००,७१७ मिळतात.


कमी गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी, जर एखाद्याने या योजनेत फक्त ₹६०० दरमहा १० वर्षे गुंतवले, तर त्याला एकूण परत मिळणारी रक्कम ₹१ लाखाच्या आसपास होते. जेष्ठ नागरिकांसाठी ही रक्कम फक्त ₹५८५ इतकी असते. त्यामुळे ही योजना अल्प बचतदारांसाठीही उपयुक्त आहे.


ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी आदर्श पर्याय मानली जात आहे. नियमित मासिक बचतीद्वारे भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याची संधी SBI च्या या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा : आता प्रत्येकाला मिळणार पेन्शन, शासनाची नवी योजना लवकरच लागू.

Share This Article