Ladki Bahin Yojana June Installment: अनेक महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा जून महिना हप्ता; कारण समोर

2 Min Read
Ladki Bahin Yojana June Installment Rejected Women Maharashtra

Ladki Bahin Yojana June Installment Rejected Women Maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील काही लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रतीक्षा सुरु असली तरी, राज्य सरकारने काही निकषांनुसार पात्रता तपासणी सुरू केली असून अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत.

कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता?

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी सरकारने काही स्पष्ट अर्हता निकष ठरवले आहेत. खालील गटातील महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही:

ज्या महिलांनी आधीच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे.
ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे.
शासकीय/निमशासकीय कर्मचारी असलेल्या महिला.
ज्या महिलांचे अर्ज पडताळणी दरम्यान अमान्य ठरले आहेत.

अर्जांच्या फेरतपासणीचा फटका

लाडकी बहीण योजनेत फसवणुकीच्या घटना समोर आल्यामुळे सरकारकडून लाभार्थ्यांची फेर पडताळणी (reverification) सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत अनेक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. विशेषतः अनेक लाभार्थ्यांनी सरकारी कर्मचारी असूनही अर्ज केल्याचे समोर आले आहे.

जून महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर नाही

सध्या महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याची उत्सुकता आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच ही तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी.

हेही वाचा : Bank Holidays July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँका बंद.

Share This Article