Solar Spray Pump Mahadbt Subsidy Scheme Apply Process 2025 : महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली सौरचालित फवारणी पंप योजना शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेतीसाठी मोठी मदत ठरत आहे. या योजनेअंतर्गत फवारणी पंपाच्या खरेदीसाठी सरकारकडून 70% ते 100% पर्यंत अनुदान देण्यात येत असून, याचे प्रमाण लाभार्थ्याच्या वर्गवारी, वय, जमीनधारकतेची स्थिती आणि इतर निकषांवर अवलंबून आहे.
Solar Spray Pump योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
ही योजना शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारा फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी आहे, ज्यामुळे इंधन किंवा विजेवरील खर्च वाचतो.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. काही समाजमाध्यमांवर 100% अनुदान मिळणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनुदानाचे प्रमाण विविध निकषांवर ठरते.
अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. कोणत्याही खाजगी एजंटकडून अर्ज करू नये, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID)
आधार कार्ड
7/12 उतारा किंवा मालमत्तेचा पुरावा
बँक पासबुक
ओळखपत्र (PAN कार्ड, शिधापत्रिका इ.)
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज करताना लक्षात घ्या
अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवरूनच करा.
अर्ज करताना कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करणे बंधनकारक आहे.
अर्जात चुकीची माहिती दिल्यास अर्ज अमान्य केला जाऊ शकतो.
हेही वाचा : अनेक महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा जून महिना हप्ता; कारण समोर.