Post Office RD Investment Returns : भविष्यासाठी सुरक्षित आणि शाश्वत गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची Recurring Deposit (RD) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. फक्त ₹5,000 मासिक गुंतवणुक करून तुम्ही 5 वर्षांत लाखोंची रक्कम जमा करू शकता. विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो आणि कोणतीही बाजारातील जोखीम नसते.
पोस्ट ऑफिस RD योजना काय आहे?
पोस्ट ऑफिसची RD योजना ही एक मासिक गुंतवणूक योजना आहे, ज्यात सध्या 6.7% वार्षिक व्याजदर मिळतो. तुम्ही फक्त ₹100 पासून गुंतवणूक सुरू करू शकता, आणि या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तुमची गुंतवणुक व्याजासह परत मिळते.
₹5,000 मासिक गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?
जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला ₹5,000 गुंतवले, तर:
5 वर्षांत तुमची एकूण ₹3 लाख गुंतवणूक होईल.
6.7% व्याजदरावर, मॅच्युरिटीवेळी तुम्हाला ₹3,56,830 मिळतील.
जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी ही गुंतवणूक सुरू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक ₹6 लाख होईल आणि मॅच्युरिटी रक्कम ₹8,54,272 पर्यंत होते.
खात कस उघडायच?
पोस्ट ऑफिस RD योजनेत खात उघडण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे:
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा.
तुमच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो सोबत ठेवा.
आवश्यकतेनुसार KYC प्रक्रिया पूर्ण करा.
काही वेळातच तुमच खात उघडल जाईल.
ही योजना का निवडावी?
बाजाराच्या चढ-उतारांपासून मुक्त.
गॅरंटीड परतावा.
दर महिन्याला बचतीची सवय.
दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी उत्तम पर्याय.
हेही वाचा : मुलींच्या लग्नासाठी मिळणार 20,000 रुपये आर्थिक मदत; जाणून घ्या संपूर्ण माहिती.