Daily 10000 Income Government Scheme Fake : सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर असा दावा केला जात आहे की सरकारने एक नवीन योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत नागरिकांना रोज 10,000 रुपये कमावण्याची संधी दिली जात आहे. मात्र, यामागच सत्य जाणून घेणंl अत्यंत गरजेच आहे.
काय आहे दावा?
वेबसाइट india09.com ने दावा केला आहे की केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत नागरिकांना दिवसाला ₹10,000 कमावता येणार असल्याच सांगितल गेल. या बातमीत असही नमूद करण्यात आल आहे की अनेक लोकांनी आधीच ₹80,000 ते ₹3,50,000 पर्यंत कमावले आहेत. बातमी अधिक विश्वासार्ह वाटावी म्हणून तिच सादरीकरण वृत्तसारख करण्यात आल होत.
काय आहे सत्य?
सरकारने या दाव्याला पूर्णपणे फेटाळून लावल आहे. अशी कोणतीही अधिकृत योजना अस्तित्वात नाही. हे संपूर्ण प्रकरण बनावट असून, नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहाव असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
काय धोका होऊ शकतो?
अशा बनावट वेबसाइट्सवर नागरिकांची वैयक्तिक माहिती — जसे की आधार क्रमांक, बँक डिटेल्स, OTP — मागितली जाते. ही माहिती दिल्यास सायबर गुन्हेगार त्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करू शकतात किंवा फसव्या कर्ज प्रकरणात आपल नाव वापरू शकतात.
नागरिकांनी काय कराव?
अशा वेबसाईट्सवर वैयक्तिक माहिती देण टाळा
फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरच विश्वास ठेवा
संशयास्पद योजनेविषयी त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करा
निष्कर्ष:
‘दिवसाला ₹10,000 कमवा’ अस म्हणणारी सरकारी योजना पूर्णपणे फसवी आहे. सरकारचा याच्याशी काहीही संबंध नाही. नागरिकांनी अशा भ्रामक माहितीकडून दूर राहण आणि इतरांनाही सावध करण आवश्यक आहे.