घरबसल्या करा अर्ज आणि मिळवा मोफत वीज; आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांनी घेतला लाभ PM Surya Ghar Yojana Maharashtra Online Apply

2 Min Read
PM Surya Ghar Yojana Free Electricity Solar Panel Benefits

नवी दिल्ली | ४ जून २०२५ : PM Surya Ghar Yojana Free Electricity Solar Panel Benefits — केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजनेला’ देशभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 10 कोटी घरांवर सोलर रूफटॉप पॅनल बसवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले असून, यामुळे वीजबिलात लक्षणीय घट होणार आहे आणि नैसर्गिक ऊर्जेला चालना मिळणार आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा आजवर 1.5 कोटींहून अधिक कुटुंबांनी लाभ घेतला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी प्रति घर सरासरी ₹12,000 पर्यंत बचत होत आहे. यामुळे एकूण ₹1,600 कोटींची वार्षिक बचत झाली आहे. सरकारने याच गतीने या योजनेतून 2027 पर्यंत ₹5 लाख कोटींची बचत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

वीजबिलात कपात आणि पर्यावरणाचा बचाव

सोलर पॅनलमुळे फक्त आर्थिक बचतच नव्हे तर पर्यावरणीय फायदाही दिसून येतो. योजना लागू झाल्यापासून 2.5 गीगावॅट उत्पादन क्षमतेची भर पडली असून दरवर्षी 1.8 मिलियन टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली आहे.

सबसिडी आणि कर्ज

सरकार 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टमसाठी ₹30,000 ते ₹78,000 पर्यंत सबसिडी देते. शिवाय कमी व्याजदरात कर्ज व सुलभ हप्त्यांमध्ये परतफेड योजना उपलब्ध आहेत. सोलर इंडस्ट्रीमुळे 10 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या असून, आगामी काळात 20 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

अर्ज कसा करावा?

पिएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत pmsuryaghar.gov.in वेबसाईट ला भेट द्या. अर्ज केल्यानंतर तुम्ही अर्जाचे स्टेटस देखील ट्रॅक करू शकता. शहरी व ग्रामीण भागांतील सर्व लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी सरकारने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

गुणवत्ता, स्टोरेज आणि संशोधन

सरकार स्वदेशी सोलर उपकरणांना प्रोत्साहन देत असून, बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञान आणि सोलर पॅनल्सच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात येत आहे. यामुळे भविष्यात रात्रीच्या वेळीही सौरऊर्जेचा वापर शक्य होईल.

हेही वाचा : 9 लाख महिलांनी घेतला बेकायदेशीर लाभ? सरकारी योजनांमधील मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर.

Share This Article