Free Silai Machine Yojana Fact Check Marathi : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि घरबसल्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. सध्या सोशल मिडिया आणि काही वेबसाइट्सवर “फ्री शिलाई मशीन योजने”बद्दलची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन दिल्या जातील, शिवाय प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसह त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
या व्हायरल माहितीनुसार, मोफत शिलाई मशीन योजनेसाठी महिलांना ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, ओळखपत्र यांसारखी कागदपत्र आवश्यक आहेत. या योजनेतून महिलांना ₹१५,००० पर्यंत आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही दिल जाईल, असही सांगितल जातय.
पण या सर्व माहितीकडे बघताना एक महत्त्वाच सत्य लक्षात घ्याव लागेल कि – ही योजना प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.
फॅक्ट चेक: मोफत शिलाई मशीन योजना खोटी आहे
सरकारच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर — जसे की https://www.india.gov.in/ किंवा https://pmvishwakarma.gov.in — अशा प्रकारची कोणतीही मोफत शिलाई मशीन योजना जाहीर केलेली नाही. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत देखील मोफत शिलाई मशीन देण्याचा कुठलाही उल्लेख नाही.
या योजनेच्या नावाखाली सोशल मिडिया आणि काही फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सवरून लोकांकडून वैयक्तिक माहिती गोळा केली जात आहे. आधार क्रमांक, बँक खाते तपशील इत्यादी माहिती या फसव्या वेबसाइट्सवर भरली गेल्यास डेटा चोरी किंवा आर्थिक फसवणुकीचा धोका संभवतो.
सत्य काय आहे?
“फ्री शिलाई मशीन योजना 2025” ही केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना नाही.
कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर याचा उल्लेख नाही.
अर्जासाठी सांगितलेल्या लिंक फसव्या आहेत.
अशा भ्रामक योजनांमुळे महिलांमध्ये दिशाभूल होऊ शकते.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
जर तुम्हाला WhatsApp, Facebook किंवा YouTube वर अशा योजनांबद्दल माहिती मिळाली असेल, तर कृपया ती शेअर करण्याआधी सरकारी वेबसाइटवर तपासणी अवश्य करा. [gov.in] किंवा [nic.in] या डोमेनवर असलेली माहितीच विश्वासार्ह मानावी.
कृपया तुमची वैयक्तिक माहिती अशा फसव्या वेबसाइट्सवर शेयर करू नका.
हेही वाचा : मोफत लॅपटॉप योजनेसाठी अर्ज सुरू? जाणून घ्या संपूर्ण माहिती, पात्रता आणि कागदपत्रांची यादी.