Ladki Bahin Yojana: अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू; सरकारचा स्पष्ट इशारा

2 Min Read
Ladki Bahin Yojana May Payment Fraud Detection ITR Maharashtra

मुंबई : Ladki Bahin Yojana May Payment Fraud Detection ITR Maharashtra — राज्य सरकारने ४ जून पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे. पात्र महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये ₹१,५०० चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून, उर्वरित लाभार्थींच्याही खात्यात लवकरच रक्कम जमा होईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.

मे महिन्याचा हफ्ता वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून पात्र लाभार्थ्यांच्या Aadhaar लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये हफ्त्याचे पैसे जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना दरमहा आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळत आहे.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू

अनेक अपात्र लाभार्थी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आयकर विभागाच्या डेटाचा वापर करून अपात्र लाभार्थ्यांना ओळखून त्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

३ जून २०२५ रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला अधिकृतपणे आयकर डेटाची प्रवेशअधिकता दिली आहे. या डेटाच्या आधारे जे लाभार्थी करदाता आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे.

कोण पात्र आहेत?

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार महिला:

महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी
वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे
कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरीत नसावे (स्थायी/कंत्राटी)
चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे
कोणत्याही दुसऱ्या शासकीय योजनेंतर्गत ₹१५०० पेक्षा जास्त रक्कम मिळत नसावी
स्वतःच्या नावावर आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक

सरकारचा स्पष्ट इशारा

सरकारने फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले असून, योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी डेटा पडताळणी अधिक कठोर केली जाणार आहे. लाभ घेणाऱ्या महिलांनी योग्य माहिती देऊन पात्रतेची पूर्तता करण अत्यावश्यक असल्याच पुन्हा स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा : या कारणामुळे 5 लाख महिलांना आर्थिक मदतीपासून मुकाव लागणार; महिलांसाठी सरकारच आवाहन.

Share This Article