नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता वाढणार? ९३ लाख शेतकरी ७व्या हप्त्यासाठी पात्र Namo Shetkari Yojana Hapta Update

2 Min Read
Namo Shetkari Yojana Hapta Update June 2025

Namo Shetkari Yojana Hapta Update June 2025 — नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या ६,००० रुपयांच्या हप्त्याच्या रकमेत वाढ होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. या योजनेतून सध्या मिळणारा हप्ता ₹६,००० ऐवजी ₹९,००० करण्याची घोषणा त्यांनी पीएम किसान योजनेच्या हप्तावाटप कार्यक्रमात केली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.

खरीप हंगामाआधी हप्ता देण्याचे आश्वासन अधांतरी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच वितरित केला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, अतिरिक्त ₹३,००० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात नसल्याने या घोषणांवर कार्यवाही झालेली नाही.

७वा हप्ता अजूनही प्रतीक्षेत

एप्रिल ते जुलै या कालावधीतील सातवा हप्ता जूनमध्ये देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाल्याने राज्यातील शेतकरी पेरणीसाठी खते-बियाण्यांची खरेदी करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, अद्याप शासनस्तरावर यासंदर्भात स्पष्टता नाही.

अॅग्रीस्टॅक क्रमांक अद्याप बंधनकारक नाही

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, अद्याप शासनाने याबाबत कोणतीही अंमलबजावणी सुरू केलेली नाही. भविष्यात फक्त अॅग्रीस्टॅक क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

९३ लाख शेतकरी ७व्या हप्त्यासाठी पात्र

राज्यातील ९३,०७,७२१ शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. परंतु अतिरिक्त निधीच्या अभावामुळे आणि अंमलबजावणीतील ढिलाईमुळे लाखो शेतकऱ्यांच्या हफ्त्याचे पैसे अडकले आहेत.

हेही वाचा : लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट! कुणाला ₹५०० कुणाला ₹१५०० तर कुणाला ₹40,000?.

Share This Article