PF खात्यातून काढा आता थेट ATM द्वारे किंवा UPI च्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम EPFO Atm UPI Withdrawal Service Launch

2 Min Read
EPFO Atm UPI Withdrawal Service Launch August 2025

EPFO Atm UPI Withdrawal Service Launch August 2025 : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक नवीन आणि आधुनिक सेवा सुरु करत आहे, ज्यामुळे आता सदस्य आपल्या PF खात्यातून थेट एटीएमद्वारे किंवा UPI च्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काही मिनिटांत काढू शकणार आहेत. सध्या या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज, पडताळणी आणि विविध औपचारिकतांमुळे 10 ते 15 दिवस लागतात. मात्र, नवीन सिस्टममुळे ही वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

EPFO च्या नवीन IT सॉफ्टवेअर 3.0 अंतर्गत हे बदल लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये EPF Withdrawal Card जारी केले जाईल, ज्याद्वारे खातेदार एटीएम किंवा UPI द्वारे रक्कम काढू शकतील. आपत्कालीन परिस्थितीत किमान वेळेत निधी मिळवण ही मोठी गरज असून, नवीन प्रणालीमुळे हे शक्य होणार आहे. नव्या नियमांनुसार, खात्यात ₹2 लाखांपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या सदस्यांना त्यांच्या शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत किंवा कमाल ₹1 लाख इतकी रक्कम कोणत्याही मंजुरीशिवाय त्वरित मिळू शकेल.

सध्या या नव्या सिस्टीमच्या सहा सॉफ्टवेअर मॉड्यूलपैकी तीनचे ट्रायल यशस्वी झाले असून, उर्वरित तीनवर काम सुरू आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या देखरेखीखाली हे सॉफ्टवेअर विकसित होत असून, RBI बरोबर आवश्यक बँकिंग प्रोटोकॉलसंदर्भात सल्लामसलत पूर्ण झालेली आहे. अपेक्षा आहे की ऑगस्ट 2025 पर्यंत हा सिस्टम काही शहरांमध्ये सुरु केला जाईल आणि वर्षअखेरपर्यंत देशभर लागू केला जाईल.

या नव्या प्रणालीमुळे EPFO सदस्यांना केवळ निधी काढण्याचीच नव्हे तर बॅलन्स तपासण्याची, स्टेटमेंट डाऊनलोड करण्याची आणि ऑटो-क्लेमची सुविधाही मिळेल. एकंदरित, या योजनेमूळे कर्मचार्‍यांना त्यांच्या भविष्य निधी खात्याचा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक वापर करता येणार आहे.

हेही वाचा : लाखो शेतकरी 2000 रुपयांपासून राहणार वंचित; या कारणांमुळे थांबणार शेतकऱ्यांचा लाभ.

Share This Article