2000 रुपये कधी जमा होणार? सरकारच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

2 Min Read
PM Kisan Yojana 20th Installment June 2025

PM Kisan Yojana 20th Installment June 2025 :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 19 हप्ते मिळाले आहेत. आता पिएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची सर्वत्र प्रतीक्षा सुरू असून, 20वा हफ्ता जून 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


एकूण 19 हप्ते जमा झाले; आता 20व्या हप्त्याची प्रतीक्षा


पिएम किसान योजनेद्वारे सरकार दरवर्षी 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये (2,000 × 3) थेट जमा करते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. शेवटचा म्हणजेच 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून खात्यात पाठवला होता.


हप्त्यांचे अंतर 4 महिन्यांचे


सरासरी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येक हप्ता जमा केला जातो:


17वा हप्ता: जून 2024

18वा हप्ता: ऑक्टोबर 2024

19वा हप्ता: फेब्रुवारी 2025

हप्त्यांमधील अंतर पाहता 20वा हप्ता जून 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच केंद्र सरकारकडून तारीख स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


तुमची नावनोंदणी आणि KYC पूर्ण आहे का?


20वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी खात्री करावी की त्यांचे e-KYC, बँक खाते तपशील, आणि जमिनीच्या मालकीसंबंधी माहिती अद्ययावत आणि बरोबर आहे. चुकीच्या माहितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते रखडतात.

हेही वाचा : मोठ नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवा! Aadhaar या तारखेपर्यंत बँक खात्याशी लिंक करा.

Share This Article