PF Money ATM Withdrawal: PF चे पैसे कधीपासून ATM व UPI द्वारे काढता येणार? EPFO चा मोठा निर्णय

2 Min Read
EPFO PF Money ATM UPI Withdrawal

नवी दिल्ली | ५ जून २०२५: EPFO, PF Money ATM UPI Withdrawal : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या खातेदारांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू करत आहे. आता लवकरच EPF खात्यातील पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज किंवा कार्यालयीन प्रक्रियेची गरज भासणार नाही. त्याऐवजी, खातेदारांना थेट ATM कार्ड आणि UPIच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. EPFO लवकरच ‘EPFO 3.0’ हे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करणार असून, त्यामार्फत ही सेवा उपलब्ध होणार आहे.

या नव्या व्यवस्थेअंतर्गत, खातेदारांना एक खास EPFO कार्ड जारी करण्यात येईल, जे कोणत्याही सामान्य ATM कार्डप्रमाणेच वापरता येईल. या कार्डाद्वारे खातेदार आपल्या EPF खात्यातून थेट पैसे काढू शकतील. सुरुवातीला खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ATM मधून काढण्याची मुभा असेल. याशिवाय, UPIच्या माध्यमातून आपल्या खात्यातील रक्कम थेट इच्छित बँक खात्यातही ट्रान्सफर करता येणार आहे.

EPFO च्या अधिकाऱ्यांनुसार, ही संपूर्ण प्रणाली जून 2025 च्या अखेरपर्यंत कार्यान्वित केली जाईल आणि त्याच महिन्यापासून सर्व EPF खातेदारांना या नव्या सुविधेचा लाभ मिळू लागेल. विशेष म्हणजे, या नव्या डिजिटल योजनेमुळे केवळ पैसे काढण्याचीच सोय होणार नाही, तर खात्यातील शिल्लक तपासणे, ट्रान्सफर करणे आणि अन्य सेवा सुद्धा सहजपणे उपलब्ध होतील.

सरकारी व खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यात EPFशी संबंधित व्यवहार अधिक पारदर्शक आणि तात्काळ होणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन गरजांमध्ये त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल.

हेही वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना.

Share This Article