Home Loan Low Credit Score : जर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) 500 च्या आसपास असेल, आणि तुम्ही अशा परिस्थितीत घर खरेदीसाठी होम लोन मिळेल का याचा विचार करत असाल? तर सध्याच्या आर्थिक व्यवस्थेत बँका कर्ज मंजुरीसाठी सर्वाधिक महत्त्व देतात ते म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर. त्यामुळे कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे एक मोठ आव्हान बनल आहे.
भारतामध्ये सिबिल (CIBIL), इक्विफॅक्स (Equifax), एक्सपिरियन (Experian), आणि CRIF High Mark या चार प्रमुख क्रेडिट एजन्सीज आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर ठरवतात. हा स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो आणि 500 स्कोअर ‘खराब’ मानला जातो. त्यामुळे बँका अशा अर्जदारांना कर्ज मंजूर करताना जास्त सतर्कता बाळगतात किंवा काही वेळा कर्ज देत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, होम लोनसाठी किमान 650 आणि आदर्शतः 750 पेक्षा जास्त स्कोअर असावा लागतो. चांगला स्कोअर असल्यावर केवळ कर्ज मिळण सोप होत नाही, तर त्यासाठीच्या अटी, व्याजदर हाही अधिक चांगला असतो. मात्र, जर स्कोअर 500 च्या आसपास असेल, तर अनेक अटींनिशी काही खास NBFC किंवा बँका लोन देतात, पण त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात व्याजदर लावला जातो.
उदाहरणार्थ, जिथे चांगला स्कोअर असलेल्या व्यक्तींना 8% च्या जवळपास व्याजदराने लोन मिळत, तिथे 500 स्कोअर असणाऱ्यांना 10% पेक्षा अधिक दराने लोन मिळण्याची शक्यता असते. याशिवाय, बँका मोठ डाउन पेमेंट, गारंटर, किंवा मालमत्तेची हमीही मागू शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया थोडी कठीण होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत ‘लोन अगेंस्ट प्रॉपर्टी’ (Loan Against Property – LAP) हा एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुमची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज मिळू शकत. अशा प्रकारच्या कर्जांवर 9.05% ते 13.50% दरम्यान व्याज लागू शकत.
सर्वात उत्तम पर्याय म्हणजे स्वतःचा क्रेडिट स्कोअर सुधारणे. नियमित ईएमआय भरणे, क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर, कर्जाची वेळेवर परतफेड आणि चुकीच्या क्रेडिट एंट्रीज दुरुस्त केल्यास 6 ते 12 महिन्यांत स्कोअरमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. त्यानंतर तुम्ही चांगल्या अटींसह होम लोनसाठी पात्र ठरू शकता.
हेही वाचा : महिलांसाठी खास योजना: दोन वर्षांत मिळणार २.३२ लाख रुपये, असा करा अर्ज.