PF काढण झाल खूपच सोप; १ लाखापर्यंतचा दावा फक्त ७२ तासांत खात्यात

2 Min Read
PF Withdrawal Claim EPFO Update 2025

PF Withdrawal Claim EPFO Update 2025 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) कडून PF काढण्याची प्रक्रिया आता आणखी वेगवान आणि पारदर्शक करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे, १ लाख रुपयांपर्यंतचे दावे फक्त ७२ तासांत म्हणजेच तीन दिवसांत बँक खात्यात जमा होत आहेत.

सरकारचा दावा: जलद प्रक्रिया, थेट खात्यात पैसे

सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये करण्यात आलेल्या 68.96 लाख दाव्यांपैकी 50% दावे 72 तासांत पूर्ण झाले आहेत. यातील 99% दावे ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले, यामुळे वेळ वाचतो आणि भ्रष्टाचार टाळता येतो. यापुढे सरकारचे लक्ष्य आहे की 2025-26 मध्ये सर्व 1 लाखांपर्यंतचे दावे 72 तासांत निकाली निघावेत. 1 लाखाच्या पुढील रकमेचे 90% दावे 20 दिवसांत निकाली काढले जात आहेत.

कोणती खाती जलद प्रक्रिया पात्र?

2012 नंतर उघडलेली खाती पूर्णपणे डिजिटल आहेत, त्यामुळे त्यातून निधी वेगाने ट्रान्सफर होतो.
2012 पूर्वीची खाती अजूनही दस्तऐवज पडताळणीच्या प्रक्रियेत असल्याने थोडा उशीर होतो.

PF कधी आणि कशासाठी काढता येतो?

लग्न किंवा मुलांच्या शिक्षणासाठी: किमान 7 वर्षे सदस्यत्व आवश्यक
घर खरेदी, बांधकाम वा दुरुस्तीसाठी: किमान 5 वर्षे सदस्यत्व आवश्यक
आजारीपणासाठी: कोणतीही अट नाही — केव्हाही पैसे काढता येतात

PF काढल्यावर कर लागतो का?

जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 5 वर्षे नोकरी केली असेल, तर PF काढल्यावर कोणताही कर लागू होत नाही.
जर 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली, तर 10% TDS लागतो.
पॅन कार्ड नसल्यास 30% TDS आकारला जातो.
मात्र, फॉर्म 15G/15H सादर केल्यास TDS आकारला जात नाही.

हेही वाचा : शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २०,००० रुपये बोनस; राज्य शासनाची यादी प्रसिद्ध, निधी वितरण सुरू.

Share This Article