RBI 100 200 Notes Atm Interchange Fee Hike 2025 : देशभरातील एटीएम यंत्रणा आता मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दिलेल्या नव्या आदेशानुसार, लवकरच देशातील बहुतेक एटीएममध्ये ₹100 आणि ₹200 च्या नोटांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दुसरीकडे, इंटरचेंज फी वाढवण्यात आल्याने काही ग्राहकांसाठी एटीएममधून रोख रक्कम काढणे महाग होणार आहे.
एटीएममधून लहान मूल्याच्या नोटांचा पुरवठा वाढणार
RBI च्या आदेशानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील किमान 75% एटीएममध्ये एक कॅसेट ₹100 किंवा ₹200 च्या नोटांसाठी राखीव ठेवण बंधनकारक करण्यात आल आहे. डिसेंबर 2024 च्या तुलनेत सध्या 73% एटीएममध्ये या नोटांचा पुरवठा सुरू झाला आहे, हे एक मोठ यश मानल जात आहे.
भारताची आघाडीची रोख व्यवस्थापन कंपनी CMS Info Systems च्या मते, ग्राहकांच्या एकूण खर्चापैकी सुमारे 60% व्यवहार आजही रोखीनेच होतात. त्यामुळे लहान मूल्याच्या नोटांची गरज अधिक असल्याचे स्पष्ट होते, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांत.
2026 पर्यंत कठोर नियम
RBI च्या परिपत्रकानुसार, 31 मार्च 2026 पर्यंत हेच उद्दिष्ट अधिक कठोर होणार असून, त्या वेळेपर्यंत 90% एटीएममध्ये ₹100 किंवा ₹200 च्या नोटा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, अशी अट लागू होणार आहे.
इंटरचेंज फी वाढणार – ग्राहकांवर काय परिणाम होणार?
1 मे 2025 पासून RBI ने ATM इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे, विशेषतः जे दर महिन्याला फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा पार करतात, त्यांना जादा शुल्क भराव लागणार आहे.
इंटरचेंज फी म्हणजे काय?
जेव्हा एखादा ग्राहक आपल्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा त्याची प्रक्रिया करणाऱ्या बँकेला त्यासाठी फी आकारली जाते. हीच इंटरचेंज फी आहे, ज्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो. उदाहरणार्थ, बँक ऑफ इंडिया बँकेच्या ग्राहकाने जर बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएममधून पैसे काढले आणि फ्री मर्यादा ओलांडली असेल, तर त्या व्यवहारासाठी जादा शुल्क लागू शकते.
हेही वाचा : या योजनेत ₹3000, ₹5000 किंवा ₹10,000 गुंतवल्यास किती परतावा मिळेल.