SBI चा खातेदारांना झटका; बचत व एफडीवरील व्याजदरात कपात

2 Min Read
SBI Interest Rate Cut June 2025 Savings Fd Impact

मुंबई, १८ जून २०२५ : SBI Interest Rate Cut June 2025 Savings Fd Impact – देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बचत खात्यावरील व फिक्स्ड डिपॉझिट (FD) खात्यांवरील व्याजदरात कपात केली असून, हे नवीन दर 15 जून 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी खातेदारांवर होणार आहे.

बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

SBI ने सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत आता दर 2.5% वर आणला आहे. यापूर्वी 10 कोटींपेक्षा कमी रकमेच्या खात्यांना 2.7% तर 10 कोटी किंवा त्याहून अधिक ठेव असणाऱ्यांना 3% इतके व्याज मिळत होते.

फिक्स्ड डिपॉझिटवरील बदल

रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट्स म्हणजेच FD संदर्भातही बँकेने महत्त्वाचे बदल केले आहेत.

211 दिवस ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी FD वरचा व्याजदर 6.3% वरून 6.05% झाला आहे.
2 वर्षांपासून 3 वर्षांपर्यंतच्या FD साठी दर 6.7% वरून 6.45% इतका करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम

ज्येष्ठ नागरिकांसाठीही FD वरचे व्याजदर कमी झाले आहेत:

मॅच्योरिटीच्या वेळी 2-3 वर्षांच्या FD वरचा दर 7.2% वरून 6.95% करण्यात आला आहे.
या कपातीचा सर्वाधिक परिणाम निवृत्त नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय ठेवीदारांवर होण्याची शक्यता आहे.

बँकेचा सल्ला

SBI कडून यासंदर्भातील अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, ग्राहकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन दर लागू झाल्यामुळे आपल्या खात्यांवरील व्याजाचे पुनर्मूल्यांकन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

हेही वाचा : महायुती सरकारचा मोठा निर्णय; आता यांना मिळणार दरमहा ₹२०,००० मानधन.

Share This Article