आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमच्या भागात कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो मोफत उपचार? येथे पहा संपूर्ण यादी Ayushman Bharat Yojana Hospitals List

2 Min Read
Ayushman Bharat Yojana Hospitals List Online Check

Ayushman Bharat Yojana Hospitals List Online Check : सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण तुमच्या भागात कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार होतो हे अजूनही माहिती नाही? अशीच शंका अनेक लोकांमध्ये दिसून येते. ही माहिती मिळवण्याची पद्धत सरकारने अगदी सोपी केली असून, घरबसल्या मोबाईलवरूनच संपूर्ण रुग्णालयांची यादी पाहता येते.

२०१८ साली आयुष्मान भारत योजना (PM-JAY) सुरू झाली आणि आतापर्यंत देशभरात लाखो गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा झाला आहे. या योजनेत प्रत्येकी ₹5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा कव्हर मिळतो आणि त्यातून सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करता येतो.

कोणत्या रुग्णालयांमध्ये मिळतो आयुष्मान योजनेतुन मोफत उपचार?

अनेक जणांचा प्रश्न पडतो की, “माझ्या भागात कोणते रुग्णालय आयुष्मान योजनेसाठी पात्र आहे?” याच उत्तर मिळवण आता अगदी सोप झाल आहे. यासाठी सरकारची अधिकृत वेबसाइट वापरायची आहे:

  1. वेबसाइट उघडल्यावर उजव्या बाजूला “Find Hospital” हा पर्याय दिसेल.
  2. त्यावर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल.
  3. तिथे तुमच राज्य, जिल्हा आणि रुग्णालयाचा प्रकार (सरकारी/खासगी) निवडावा लागेल.
  4. सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या भागातील आयुष्मान योजना मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी समोर येईल.

आयुष्मान योजनेअंतर्गत कोणते उपचार मोफत मिळतात?

आयुष्मान योजनेअंतर्गत हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अपघातजन्य उपचार, शस्त्रक्रिया अशा अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार होतो. उपचारांची यादीही वेबसाइटवर तपासता येते.

तुम्ही पात्र आहात का?

जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS), BPL यादीत असलेले, किंवा एसईसीसी डेटाबेसमध्ये नाव असलेले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. खात्रीसाठी स्थानिक आरोग्य केंद्र किंवा “आरोग्य मित्र” यांच्याशी संपर्क साधा.

डिजिटल युगात आरोग्य सेवा तुमच्या हातात!

फक्त काही क्लिकमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सर्व अधिकृत रुग्णालयांची यादी तपासू शकता यामुळे गरजूंना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मोफत उपचार मिळू शकतो.

हेही वाचा : महाराष्ट्रात चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी १० लाखांपर्यंत सबसिडी, सरकारचा मोठा निर्णय.

Share This Article