मुंबई | ४ जून २०२५ : Cow Shed Subsidy Yojana Maharashtra Farmers Apply Process – ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस किंवा इतर दुधाळ जनावरे असतील त्यांच्यासाठी शासनाकडून एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गाय गोठा बांधकाम अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹77,188 पर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. गोठा बांधकामासाठी लागणारा खर्च कमी व्हावा आणि दुग्धव्यवसाय अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करता यावा, यासाठी ही खास योजना (Gay Gotha Yojana) राबवली जात आहे.
ही योजना ‘शरद पवार ग्राम समृद्धी योजने’अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव, आवश्यक कागदपत्रे, आणि इस्टीमेट सादर करणे आवश्यक आहे.
गाय गोठा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
बँक पासबुकची प्रत
ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र
गोठा बांधकाम प्रस्ताव आणि खर्चाचे अंदाजपत्रक (Estimate)
या योजनेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे पाठवला जातो. तिथून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. मंजुरीनंतर शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते.
शेतकऱ्यांसाठी गोठा का आवश्यक?
दुधाळ जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यास त्यांना विविध आजार होण्याची शक्यता वाढते. जनावरांचे आरोग्य बिघडल्यास दुग्धउत्पादनात घट येते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावरांसाठी गोठा नसणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा, अस आवाहन शासनाकडून करण्यात आल आहे.
योजनेविषयी अधिक माहिती कुठे मिळेल?
ग्रामपंचायत कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेशी संबंधित प्रस्तावाचा नमुना, इस्टीमेट फॉर्म आणि GR उपलब्ध आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्रात मान्सूनला सुट्टी? विदर्भात विजांसह पाऊस, तर उर्वरित राज्य उकाड्याने होरपळनार.