मुंबई | ३ जून २०२५: Ladki Bahin Yojana May Installment Update Aditi Tatkare News – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एक महत्त्वाच स्पष्टीकरण दिल आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना चालूच राहणार असून मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे.
राज्यातील करोडो महिलांना दरमहा 1500 रुपये देणाऱ्या या योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, मंत्री अदिती तटकरे यांनी “योजना सुरुच राहणार असून महिलांनी काळजी करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट केले आहे. त्यांनी असेही सांगितले की, सरकारी महिला कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे, कारण त्यांची आर्थिक पात्रता या योजनेंतर्गत येत नाही.
तटकरे म्हणाल्या की, “चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर कारवाई करून त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे.”
याशिवाय, त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचीही दखल घेतली. “ही योजना बंद होणार नसून, शासनाचा उद्देश गरजू महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच हप्ता खात्यावर
मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कदाचित मे व जून महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता काही माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे.
महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा
महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या जात असून, यामधून आलेल्या सूचना तातडीने अंमलात आणल्या जातील, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेत मोठा बदल? – ५० लाख महिलांचे अर्ज रद्द करणार.