फक्त ५ वर्षात मिळवा ₹४.९३ लाखांचा नफा; पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेत सुरक्षित गुंतवणुकीसह करसवलतीचा दुहेरी फायदा Post Office NSC Scheme

2 Min Read
Post Office NSC Scheme 5 Years Return Tax Benefit

Post Office NSC Scheme 5 Years Return Tax Benefit : देशातील अस्थिर शेअर बाजार व इतर गुंतवणूक पर्यायांमधील अनिश्चिततेमुळे नागरिक आता अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसच्या योजनांना पुन्हा एकदा प्राधान्य दिल जात असून, त्यातही ‘नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट’ (NSC) ही योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. ही एक अशी सरकारी योजना आहे जिच्यात गुंतवणूक केल्यास सुरक्षिततेसह उत्तम परतावाही मिळतो. सध्या NSC योजना ७.७% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने सुरू आहे. या योजनेत ₹१,००० पासून गुंतवणूक सुरू करता येते आणि गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. सर्वात महत्त्वाच म्हणजे या योजनेतील व्याजदर दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो आणि व्याज पाच वर्षांच्या शेवटी एकरकमी दिल जात. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त परतावा मिळतो.

उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने ₹११ लाखांची एकरकमी गुंतवणूक केली, तर पाच वर्षांनंतर ही रक्कम ₹१५.९३ लाखांवर पोहोचते. म्हणजेच सुमारे ₹४.९३ लाखांचा अतिरिक्त नफा मिळतो आणि तोही कोणत्याही बाजारधोक्याशिवाय. ही योजना विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते जे दीर्घकालीन आणि स्थिर परताव्याचा विचार करतात. NSC योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत आयकर कलम ८०सी अंतर्गत दरवर्षी ₹१.५ लाखांपर्यंतची करसवलतही मिळते. त्यामुळे चांगला परतावा तर मिळतोच, पण आयकरातून बचतही होते.

या योजनेत पालक आपल्या १० वर्षांखालील मुलांच्या नावाने देखील खाते उघडू शकतात. अशा खात्याचे संपूर्ण नियंत्रण पालकांकडे राहते आणि हे एक उत्तम माध्यम ठरते. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुलांच्या भविष्याची आर्थिक तयारी करण्यासाठी NSC खाते उघडता येते, तसेच काही ठिकाणी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहेत. ही योजना भारत सरकारच्या हमीखाली असल्याने गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित राहते.

अर्थातच, या योजनेमध्ये पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी अनिवार्य आहे. या कालावधीपूर्वी जर गुंतवणूकदाराने पैसे काढले, तर केवळ मूळ गुंतवणूकच परत मिळते आणि व्याज मिळत नाही. त्यामुळे योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी स्वतःच्या गरजा व आर्थिक उद्दिष्टांचा नीट विचार करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायच झाल तर, सुरक्षित गुंतवणुकीसह करसवलतीचा दुहेरी फायदा हवा असेल तर NSC योजना सध्या एक जबरदस्त पर्याय ठरू शकते.

हेही वाचा : इयत्ता 11वी प्रवेश नोंदणीसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; नोंदणीसंबंधी अडचणींसाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

Share This Article