Sukanya Samriddhi Yojana: या योजनेत ₹3000, ₹5000 किंवा ₹10,000 गुंतवल्यास किती परतावा मिळेल

2 Min Read
Sukanya Samriddhi Yojana Calculator In Marathi

Sukanya Samriddhi Yojana Returns Calculation 2025 : तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक उत्कृष्ट योजना आहे. या योजनेद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत खात उघडून नियमित बचत करू शकता आणि सुरक्षित व खात्रीशीर परतावा मिळवू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर दरवर्षी सरकारद्वारे जाहीर केला जातो. सध्या या योजनेचा वार्षिक व्याजदर 8.2 टक्के आहे. जर तुम्ही 2025 पासून गुंतवणूक सुरू केली, आणि समजा जर तुमच्या मुलीचे वय 5 वर्षे असेल, तर 2046 मध्ये खात पूर्णपणे परिपक्व (mature) होईल.

दर महिन्याच्या गुंतवणुकीनुसार मिळणारा परतावा

  1. दर महिन्याला ₹3,000 गुंतवले तर:

वार्षिक गुंतवणूक: ₹36,000
एकूण गुंतवणूक कालावधी: 15 वर्षे
एकूण जमा रक्कम: ₹5,40,000
2046 मध्ये मिळणारी रक्कम: ₹16,62,619 (अंदाजे)

  1. दर महिन्याला ₹5,000 गुंतवले तर:

वार्षिक गुंतवणूक: ₹60,000
एकूण गुंतवणूक कालावधी: 15 वर्षे
एकूण जमा रक्कम: ₹9,00,000
2046 मध्ये मिळणारी रक्कम: ₹27,71,031 (अंदाजे)

  1. दर महिन्याला ₹10,000 गुंतवले तर:

वार्षिक गुंतवणूक: ₹1,20,000
एकूण गुंतवणूक कालावधी: 15 वर्षे
एकूण जमा रक्कम: ₹18,00,000
2046 मध्ये मिळणारी रक्कम: ₹55,42,062 (अंदाजे)

सुकन्या समृद्धी योजनेचे महत्त्वाचे फायदे

मुलीच्या नावावर खाते उघडता येते (वय 10 वर्षांखाली असणे आवश्यक)
उत्पन्नावर टॅक्स सूट (सेक्शन 80C अंतर्गत)
खात्यातील सर्व व्याज व परिपक्वतेवरील रक्कम टॅक्समुक्त
खात मुलगी 21 वर्षांची झाल्यावर परिपक्व होत
उच्च शिक्षण किंवा विवाहासाठी रक्कम काढता येते

हेही वाचा : जुलै 2025 नंतर सरकारी नोकरी स्वीकारणाऱ्यांच नुकसान.

Share This Article