Maharashtra Free Laptop Scheme 2025 Fact Check : राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मोफत लॅपटॉप (Free Laptops) आणि टॅबलेट वाटप योजनेची सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विविध वेबसाईट्स, यूट्यूब चॅनेल्स आणि मेसेजेसमध्ये सांगितले जात आहे की महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू केली असून अर्ज प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.
व्हायरल माहितीनुसार, इयत्ता ५वी ते १०वीसाठी टॅबलेट तर दहावी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप वाटपाचे आश्वासन देण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ असल्याचे सांगितले जात आहे. पात्रतेचे निकष, कागदपत्रांची यादी, आणि बांधकाम कामगार कार्डसंबंधित अटी देखील या माहितीमध्ये दिल्या गेल्या आहेत.
मात्र, ही योजना प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सरकारकडून अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ना बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती आहे, ना कोणतेही शासकीय GR जारी करण्यात आले आहे.
राज्य सरकार किंवा बांधकाम कामगार मंडळाने अशा कोणत्याही “फ्री लॅपटॉप/टॅबलेट वाटप” योजनेसाठी अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. शिवाय, १ जूनपासून कोणतीही ऑनलाइन लिंक कार्यरत नाही आणि ही संपूर्ण माहिती सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सद्वारे पसरवली जात आहे.
या प्रकारच्या भ्रामक माहितींमुळे अनेक गरीब कुटुंबांमध्ये गोंधळ निर्माण होत असून, काहीजण खोट्या वेबसाइट्सवर आपली वैयक्तिक माहिती, कागदपत्रे, अगदी आधार किंवा बँक तपशील देखील अपलोड करत आहेत – जे पूर्णपणे धोकादायक आहे.
Free Laptops सत्य माहिती काय?
बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून सध्या कोणतीही लॅपटॉप किंवा टॅबलेट वाटप योजना सुरू नाही.
सरकारकडून यासंदर्भात कोणताही GR (शासन निर्णय) जारी करण्यात आलेला नाही.
अर्जासाठी कोणतेही अधिकृत पोर्टल सुरू नाही.
सोशल मीडियावर फिरणारी संपूर्ण माहिती बनावट आहे.
वाचकांसाठी सूचना:
अशा कोणत्याही योजनांसाठी अर्ज करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा शासकीय कार्यालयाकडून पुष्टी झाल्यावरच अर्ज करावा. फेक वेबसाईट्स, यूट्यूब चॅनेल्स किंवा WhatsApp मेसेजेसच्या आधारे महत्त्वाची वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही https://mahabocw.in/ या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा : मृत व्यक्तीच PAN कार्ड रद्द करण का आवश्यक आहे? रद्द न केल्यास कायदेशीर अडचणी.