नवी दिल्ली | ८ जून २०२५: UIDAI Assistant Section Officer Recruitment 2025 Salary Eligibility Form — सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आधार कार्ड व्यवस्थापन करणाऱ्या UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) संस्थेत Assistant Section Officer पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी पगार ₹35,400 ते ₹1,12,400 दरम्यान आहे.
UIDAI भरतीची ठळक वैशिष्ट्ये:
पदाचे नाव: Assistant Section Officer (ASO)
भरती पद्धत: प्रतिनियुक्ती आधारावर (Deputation Basis)
नोकरीचे ठिकाण: UIDAI प्रादेशिक कार्यालय, भोपाळ
पगार: ₹35,400 ते ₹1,12,400 (Level 6)
पात्रता अटी:
केंद्र सरकारमध्ये सध्या Level 6, किंवा Level 3/4/5 पदावर कार्यरत असलेले अधिकारी
केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था यामधील अधिकारी
संबंधित पदावर Level 3 साठी किमान ७ वर्षे, Level 4 साठी ५ वर्षे, आणि Level 5 साठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे
अर्ज करण्याची प्रक्रिया:
अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
संचालक (एचआर), UIDAI, प्रादेशिक कार्यालय, तळमजला, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन, प्रगती मैदान, नवी दिल्ली – 110001
अर्ज सुरु होण्याची तारीख: 26 मे 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 जुलै 2025
महत्वाचे फायदे:
केंद्र सरकारी पातळीवरील प्रतिष्ठित पद
उच्च पगार आणि पदोन्नतीची संधी
UIDAI सारख्या महत्त्वाच्या संस्थेत काम करण्याची संधी
शासन नियमानुसार प्रतिनियुक्तीवर नोकरी
अधिकृत अधिसूचना आणि अर्जाचा नमुना UIDAI च्या uidai.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
हेही वाचा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा महिन्याला ₹9,250 व्याज.