या योजनेत केवळ ‘इतक्या’ महिन्यात होतात पैसे दुप्पट; जाणून घ्या व्याजदर, पात्रता आणि गुंतवणुकीची संपूर्ण माहिती Post Office KVP Investment

2 Min Read
Post Office KVP Investment Double Money

Post Office KVP Investment Double Money : सतत वाढती महागाई आणि अनिश्चित भविष्याचा विचार करता, केवळ बचत पुरेशी नाही तर योग्य ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करणेही तितकेच गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसची ‘किसान विकास पत्र (KVP)’ योजना गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत आकर्षक पर्याय ठरू शकते.

किसान विकास पत्र योजनेत सध्या 7.5% व्याजदर दिला जात असून, त्याच्या आधारे 115 महिन्यांत आपण गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. विशेष म्हणजे, या योजनेत कोणताही बाजार जोखमीचा धोका नसतो. त्यामुळे ही योजना दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूकसाठी सर्वोत्तम मानली जाते.

किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये:

व्याजदर: सध्या 7.5% (कंपाउंडिंग बेसिसवर)
दुप्पट होण्याची मुदत: 115 महिने
किमान गुंतवणूक: ₹1,000 (100 च्या पटीत)
कमाल मर्यादा: नाही (गुंतवणूकीवर कोणतीही मर्यादा नाही)
खाते प्रकार: सिंगल किंवा जॉइंट दोन्ही
वय मर्यादा: 10 वर्षांवरील मुलांच्या नावानेही गुंतवणूक शक्य

उदाहरण:

जर तुम्ही या योजनेत ₹5 लाख गुंतवले, तर 115 महिन्यांनंतर ती रक्कम ₹10 लाख होईल.

Kisan Vikas Patra योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा
KVP फॉर्म भरा
ओळखपत्र (आधार, पॅन), पत्त्याचा पुरावा द्या
किमान ₹1,000 पासून गुंतवणूक सुरु करता येते

Post Office KVP योजना त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे जे जोखीम टाळून दीर्घकालीन, खात्रीशीर आणि स्थिर परतावा शोधत आहेत. आणि महत्त्वाच म्हणजे ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाते, त्यामुळे सरकारी हमी असते.

हेही वाचा : केवळ 4% व्याजदरात शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज Farmer Loan Maharashtra 2025.

Share This Article