Free Aadhaar Update Last Date Extended : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने 10 वर्षांपूर्वी काढलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची अंतिम तारीख एक वर्षाने वाढवली आहे. आता आधार अपडेटची अंतिम मुदत 14 जून 2026 करण्यात आली आहे.
मोफत ऑनलाइन अपडेटची सुविधा कायम
UIDAI च्या सूचनेनुसार, 10 वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्डमधील तपशील, विशेषतः ओळख व पत्त्याचे दस्तावेज ऑनलाइन मोफत अपडेट करता येणार आहेत. पूर्वी ही सुविधा 14 जून 2025 पर्यंत उपलब्ध होती, परंतु आता ती 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (uidai.gov.in) उपलब्ध आहे.
आधार मोफत अपडेट कसे करावे?
- वेबसाइटवर लॉगिन करा:
UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊन “Update Aadhaar” > “Document Update” पर्याय निवडा.
“Click to Submit” वर क्लिक करा. - ओटीपीद्वारे लॉगिन:
12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा टाका.
रजिस्टर्ड मोबाइलवर आलेल्या OTP द्वारे लॉगिन करा. - दस्तावेज अपडेट करा:
ओळख व पत्त्याचे कोणतेही वैध दस्तावेज (जसे की पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल इ.) अपलोड करा व सबमिट करा.
अपडेटची विनंती सबमिट केल्यानंतर ती थोड्या कालावधीत UIDAI द्वारे प्रक्रिया करून पूर्ण केली जाते.
आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे?
आधार कार्ड हे अनेक सरकारी व खासगी व्यवहारांमध्ये अनिवार्य दस्तावेज बनले आहे. अनेकदा आधार माहिती चुकीची किंवा कालबाह्य झालेली असते. अशा वेळी आधार अपडेट करून त्यातील माहिती अचूक ठेवणे महत्त्वाचे असते. यामुळे सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती, बँक खाते, ई-केवायसी इत्यादी सेवांचा अडथळा न येता लाभ घेता येतो.
हेही वाचा : या योजनेत गुंतवणूक करणे आहे एफडीपेक्षा अधिक फायदेशीर.