Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड, ऑरेंज व येलो अलर्ट जारी

2 Min Read
Maharashtra Monsoon Alert 14 June 2025

Maharashtra Monsoon Alert 14 June 2025 : महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, कोकण व घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (१४ जून) रोजी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांसारख्या घाटमाथ्याच्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाला पोषक हवामान

राजस्थान व आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. अरबी समुद्र ते ओडिशा किनाऱ्यापर्यंत कमी दाबाची स्थिती वाढल्याने राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

१४ जूनपासून कोकण व घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, रायगड व रत्नागिरीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पालघर, जळगाव, सातारा, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून, येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : Bank of Maharashtra ने कमी केले व्याजदर; गृहकर्ज, कार लोन स्वस्त, मासिक EMI मध्ये घट.

Share This Article