सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केलाच पाहिजे! तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ Ayushman Vay Vandana Card

2 Min Read
Ayushman Vay Vandana Card 5 Lakh Free Treatment Senior Citizens

Ayushman Vay Vandana Card 5 Lakh Free Treatment Senior Citizens : भारत सरकारने ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन आरोग्य योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत आयुष्मान वय वंदना देज्ञात येते. या कार्ड’द्वारे दरवर्षी ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराचा लाभ मिळतो. ही योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत असून, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी आता केवळ एका अ‍ॅपच्या माध्यमातून सहज नोंदणी करता येणार आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशभरातील सरकारी व खासगी (empanelled) रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, या नव्या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना वेळेवर दर्जेदार उपचार मिळतील.

लाभार्थ्यांना काय लाभ मिळणार?

दरवर्षी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा
१९६१ वैद्यकीय उपचार समाविष्ट, त्यात हेमोडायलिसिस, गुडघा व कंबर सांधे बदलणे, हृदयविकाराचे उपचार, कर्करोग व पक्षाघात यांसारख्या गंभीर आजारांचा समावेश
पहिल्या दिवशीपासून सर्व पूर्व-अस्तित्वातील आजारांचा समावेश
३०,००० हून अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार, त्यात १३,००० खासगी हॉस्पिटल्सही आहेत

अर्ज कसा करायचा?

१. Ayushman App डाउनलोड करा
२. लाभार्थी किंवा ऑपरेटर म्हणून लॉगिन करा
३. मोबाईल नंबर व OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा
४. लोकेशन अ‍ॅक्सेस द्या आणि आधार क्रमांकासह माहिती भरा
५. जर नाव सापडल नाही, तर eKYC प्रक्रियेत पुढे जा
६. आवश्यक माहिती व कुटुंबातील सदस्यांची नोंद करून सबमिट करा
७. eKYC पूर्ण झाल्यानंतर कार्ड तयार होईल व तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता

नोंदणीसाठी केवळ आधार कार्ड आवश्यक आहे. जर आधार कार्डावर संपूर्ण जन्मतारीख नसेल, तर फक्त जन्मवर्ष दिल्यासही १ जानेवारी त्या वर्षाचा आधार माणला जाईल.

आरोग्य मंत्रालयाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्हिडीओ ट्यूटोरियलही उपलब्ध करून दिल आहे, जे नव्या वापरकर्त्यांना नोंदणी प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करेल. केंद्र सरकारकडून ही योजना वृद्धांसाठी आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारक पाऊल ठरू शकते.

🔴 हेही वाचा 👉 डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.

Share This Article