PM Kisan Yojana 20th Installment Ekyc Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे! केंद्र सरकार लवकरच २०वा हप्ता जाहीर करण्याच्या तयारीत आहे, मात्र यंदा तुम्हाला २ हजार रुपयांचा लाभ मिळणार की नाही हे एका अत्यावश्यक कामावर अवलंबून असेल. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही हे काम केलेल नाही — त्यामुळे तुमचही नाव लाभार्थी यादीतून वगळल जाऊ शकत.
पिएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांना २,००० रुपयांचा हप्ता देते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १९ हप्ते दिले गेले असून, आता २०वा हप्ता कोणत्या दिवशी येणार याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. मात्र, तुम्ही जर अद्याप ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली नसेल, तर 20वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही, अशी स्पष्ट सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.
ई-केवायसी (e-KYC) कशी करायची?
ऑनलाइन पद्धत:
- pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
- ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका
- नंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका
- ओटीपी (OTP) टाकून प्रक्रिया पूर्ण करा
सीएससी सेंटरमधून e-KYC:
जर मोबाईल आधारशी लिंक नसेल किंवा OTP येत नसेल, तर जवळच्या CSC सेंटरवर जा
→ तिथे बायोमेट्रिक पद्धतीने तुमची e-KYC केली जाईल
लक्षात ठेवा!
e-KYC न केल्यास २०वा हप्ता अडकू शकतो
ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा
सरकारने स्पष्टपणे सांगितल आहे कि 20व्या हफ्त्याचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC अनिवार्य आहे
🔴 हेही वाचा 👉 मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, या 14 पिकांना थेट फायदा.