Maharashtra Monsoon 2025: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

2 Min Read
Maharashtra Monsoon Alert Rain Forecast 16 June 2025

Maharashtra Monsoon Alert Rain Forecast 16 June 2025 : महाराष्ट्रात यंदाचा मॉन्सून काहीसा उशिरा दाखल झाल्यानंतर आता तो सक्रिय झाला आहे. आज (16 जून) कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये २४ तासांत २५० मिमी, तर सिंधुदुर्गातील कणकवली येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांतील नागरिक व पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच आवाहन केल आहे.

इतर भागांतील हवामान

विदर्भात वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत ४० अंश, नागपूर ३९.४ अंश, ब्रह्मपुरी ३९.८ अंश इतके तापमान नोंदले गेले. मात्र, पूर्व विदर्भात विजांसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मॉन्सूनची वाटचाल

२६ मेनंतर काही काळ महाराष्ट्रात मॉन्सून थांबलेला होता. मात्र हवामान पोषक ठरत असल्याने आता त्याची प्रगती होत असून विदर्भासह गुजरात, ओडिशा, छत्तीसगडमध्ये येत्या काही तासांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

पावसाचा तपशील (24 तासांत)

कोकण: राजापूर २५० मिमी, कणकवली १०० मिमी, देवगड-लांजा ९० मिमी
मध्य महाराष्ट्र: पुणे शहर व चिंचवड ६० मिमी, राजगुरुनगर ५० मिमी
मराठवाडा: सोयगाव ५० मिमी, वैजापूर ४० मिमी
विदर्भ: वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला या भागांत उष्णता टिकून आहे, पण विजांसह पावसाची शक्यता आहे

हेही वाचा : घरबसल्या असा करा घरकुल योजनेसाठी अर्ज.

Share This Article